हैदराबाद विमानतळाच्या विस्ताराला सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 04:01 AM2018-03-29T04:01:02+5:302018-03-29T04:01:02+5:30

जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल विमानतळाचा उत्कृष्ट दशकपुर्ती सोहळा नुकतास संपन्न झाला

Hyderabad airport extension extension | हैदराबाद विमानतळाच्या विस्ताराला सुरवात

हैदराबाद विमानतळाच्या विस्ताराला सुरवात

googlenewsNext

नवी मुंबई : जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल विमानतळाचा उत्कृष्ट दशकपुर्ती सोहळा नुकतास संपन्न झाला. यावेळी विमानतळाचा विस्तार व देशातील पहिल्या स्मार्ट ग्रीनफिल्ड विमानतळ शहराच्या कामाचा शुभारंभ तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते करण्यात आला. या विकासकामांमुळे हैदराबाद विमानतळावरुन होणारया प्रवासी वाहतूकीचा दर अधिक वाढणार आहे.
आयटी हब म्हणुन परिचित असलेल्या हैदराबादच्या विकासावर तेलंगणा सरकार विशेष लक्ष देत आहे. तिथे नोकरीचे पर्याय उपलब्ध होत असल्याने आगामी काळात तिथल्या विमानतळावरुन होणारी प्रवासी वाहतुक वाढण्याची शक्यता आहे. त्याकरिता विमानतळाच्या विस्तारासह पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. हैदराबाद विमानतळावरुन प्रती तासाला होणारया विमानांच्या उड्डाणात वाढ व्हावी याकरिता धावपट्टी वाढवली जाणार आहे. त्यामुळे विमानतळावर प्रवाशी हाताळण्याची क्षमता प्रतीवर्षी ४० दशलक्षापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. साधारण दहा वर्षाचा यशस्वी टप्पा गाठल्यानंतर विमानतळाचा विस्तार होत असल्याचे जीएमआर समुहाचे अध्यक्ष जी. एम. राव यांनी सांगितले. त्यानुसार या कामाचा शुभारंभ तेलंगणाचे मुख्यमंत्री हैदराबाद येथे नुकताच संपन्न झाला. मागील दहा वर्षात हैदराबाद विमानतळावरील वाहतुक दर २१ टक्के पर्यंत वाढला आहे. तर गतवर्षी या विमानतळावरुन १८ एमपीपीए प्रवासी वाहतुक हातळली गेली आहे. मात्र धावपट्टीचा विस्तार व स्मार्ट सिटी झाल्यानंतर त्यात अधिक वाढ होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. विमानतळ परिसरात उभारली जाणारी सिटी ही थीमवर आधारीत असणार आहे. त्यामद्ये व्यवसाय, आरोग्य, शिक्षण याशिवाय मनोरंजनाच्या बाबींवर भर दिला जाणार आहे.

Web Title: Hyderabad airport extension extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.