झोपडय़ांच्या आधी बुलडोझर माङयावरून जाईल!
By Admin | Updated: November 29, 2014 02:04 IST2014-11-29T02:04:44+5:302014-11-29T02:04:44+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रंगपुरी भागातील इस्नयली कॅम्प झोपडपट्टी पाडण्याला जोरदार विरोध केला.

झोपडय़ांच्या आधी बुलडोझर माङयावरून जाईल!
राहुल गांधी आक्रमक : झोपडपट्टी पाडण्याला विरोध, पूर्वसूचना न देता कारवाई चूकीची
नवी दिल्ली : यापुढे झोपडय़ा पाडण्यासाठी आलेला बुलडोझर आधी माङया अंगावरून जाईल, असा आक्रमक पवित्र घेत, काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रंगपुरी भागातील इस्नयली कॅम्प झोपडपट्टी पाडण्याला जोरदार विरोध केला. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आम आदमी पार्टीनेही या झोपडपट्टीवासीयांच्या आंदोलनात उडी घेतली आणि ही झोपडपट्टी अशी अवेळी म्हणजे जीवघेण्या थंडीत पाडण्यामागे भाजपाचे माजी आमदार सतप्रकाश राणा यांचा हात असल्याचा आरोप केला.
दिल्ली प्रशासनाने बुलडोझर चालवून अवघ्या काही मिनिटांच्या आत इस्नयली कॅम्प येथील शेकडो झोपडय़ा जमीनदोस्त केल्या. येथील हजारो नागरिक गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत उघडय़ावरच रात्र काढत आहेत. त्यांना मिळणा:या मदतीचा ओघ मंद असला तरी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या मुद्यावरील राजकारण मात्र कमालीचे तापले आहे.
झोपडय़ा पाडण्यात आल्यावर राहुल गांधी यांनी तातडीने रात्री घटनास्थळी भेट दिली. राहुल गांधी हे कोणत्याही मदत सामग्रीशिवाय येथे आले असले तरी त्यांनी अतिशय आक्रमक होत झोपडपट्टी पाडण्याला विरोध केला. यावेळी राहुल गांधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘पुढच्या वेळी बुलडोझर झोपडपट्टय़ांवरून चालण्याआधी माङया अंगावरून चालेल. कडाक्याच्या थंडीत लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अशाप्रकारे कारवाई करणो चुकीचे आहे.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)
4झोपडपट्टी पाडण्यात आल्यानंतर भाजपाच्या एकाही नेत्याने इस्नयली कॅम्पला भेट दिली नाही. राहुल गांधी कॅम्पवर पोहोचले तेव्हा बेघर लोक उघडय़ावरच चुली पेटवून स्वयंपाकाला लागले होते. राहुल गांधी येताच लोक त्यांच्याकडे धावले. खा.राहुल यांनी अर्धा तास तेथील लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी बराच गोंधळ उडाला आणि एकवेळ चेंगराचेंगरीही होताना वाचली.
या गोंधळातच पोलिसांनी राहुल गांधींना लोकांपासून दूर केले. या भागात अंधार असल्यामुळे गोंधळात भर पडली. लोकांनी काँग्रेसच्या समर्थनार्थ आणि भाजपाच्या विरोधात घोषणाही दिल्या.