शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसुखाच्या आड येणा-या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने संपवले ! गोणीत भरुन निर्जनस्थळी फेकला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 14:08 IST

अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. विवाहबाह्यसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

ठळक मुद्देमृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला लगेच मृतदेहाची ओळख पटली नाही असे तपास अधिका-याने सांगितले.जगरामची पत्नी पपिताचे अजबसिन्ह बरोबर अनैतिक संबंध होते.

अहमदाबाद - अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. मध्य प्रदेशातील चंबळ खो-यातील वाटवा येथे ही घटना घडली. विवाहबाह्यसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपी पपिता साक्या आणि तिचा प्रियकर अजबसिन्ह जातव या दोघांना अहमदाबाद येथून अटक केली. पपिताचा नवरा जगराम साक्याचा (35) मृतदेह  9 डिसेंबरला वाटवा येथे निर्जन स्थळी गोणीमध्ये सापडला होता. 

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला लगेच मृतदेहाची ओळख पटली नाही असे तपास अधिका-याने सांगितले. फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालातून गळा आवळून  जगरामची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. जगराम साक्या वाटवा येथे भाडयाच्या घरात रहात होता. त्या भागात अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. जगरामची पत्नी पपिताचे अजबसिन्ह बरोबर अनैतिक संबंध होते. जगरामला या संबंधांबद्दल कळले होते असे पोलिसांना त्यांच्या खब-यांकडून कळले. 

त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला. पपिता आणि अजबसिन्ह पुण्यामध्ये असल्याचे पोलिसांना कळले. मध्य प्रदेश पोलिसांचे पथक पुण्यात पोहोचले तेव्हा दोघे अहमदाबाद गांधीधाम येथे निघून गेले होते. अजबसिन्ह तिथे एका खासगी फॅक्टरीमध्ये नोकरीला होता. अखेर मध्य प्रदेश पोलिसांनी अहमदाबाद येथील गीता मंदिर बस स्थानकाजवळून दोघांना अटक केली. 

पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर पपिताने हत्येची कबुली दिली. जगरामला आपल्या अनैतिक संबंधांबद्दल कळल्यानंतर मी त्याला सोडून तीन मुलांना घेऊन आग्र्याला निघून गेली होती.  पण जगराम तिला पुन्हा अहमदाबादला घेऊन आला. त्यानंतरही तिचे अजबसिन्ह बरोबर प्रेमसंबंध कायम होते. 9 डिसेंबरला अजबसिन्ह आणि जगराम साक्याचे कडाक्याचे भांडण झाल्यानंतर अजबसिन्हने रागाच्या भरात जगरामची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पपिता आणि अजबसिन्हने जगरामचा मृतदेह गोणीत भरुन निर्जन स्थळी फेकून दिला. हत्येनंतर दहा दिवसांनी हा मृतदेह सापडला.                                                        

टॅग्स :Crimeगुन्हा