पतीची जन्मठेप कायम
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:15+5:302015-02-18T00:13:15+5:30
हायकोर्ट : वर्धा जिल्ातील हत्याप्रकरण

पतीची जन्मठेप कायम
ह यकोर्ट : वर्धा जिल्ह्यातील हत्याप्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीची हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेप कायम ठेवली आहे. ही घटना वर्धा जिल्ह्यातील आहे.शरद केशव नेरीकर (४०) असे आरोपीचे नाव असून तो मानोरा, ता. हिंगणघाट येथील रहिवासी आहे. मृताचे नाव सुरेखा होते. ५ फेब्रुवारी २०१० रोजी आरोपी सुरेखाला तिच्या माहेरगावातून सोबत घेऊन गेला होता. ९ फेब्रुवारी २०१० रोजी धामणगावाजवळ सुरेखाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. शरदला सुरेखाच्या चारित्र्यावर संशय होता. ३ मार्च २०१२ रोजी वर्धा सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील खारीज करून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. हिंगणघाट पोलिसांनी घटनेचा तपास केला होता.