शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

uttarakhand glacier burst : महापुरात वाहून गेलाय पती, 3 महिन्याच्या चिमुकल्यासह वाट पाहतेय आई 

By महेश गलांडे | Published: February 11, 2021 9:42 AM

uttarakhand glacier burst : उत्तराखंडच्या ऋषिगंगा नदीमध्ये आलेला प्रलय हा नंदा देवी हिमकडा कोसळल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय भूगर्भ वैज्ञानिक आणि हिमकड्यांच्या तज्ज्ञांनी दुर्घटना हिमकडा तुटल्याने नाही तर भूस्खलन झाल्याने घडल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देउत्तराखंडच्या ऋषिगंगा नदीमध्ये आलेला प्रलय हा नंदा देवी हिमकडा कोसळल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय भूगर्भ वैज्ञानिक आणि हिमकड्यांच्या तज्ज्ञांनी दुर्घटना हिमकडा तुटल्याने नाही तर भूस्खलन झाल्याने घडल्याचा दावा केला आहे.

चामोली - उत्तराखंडमधील महापुरातील दुर्घटनेमुळे देश हळहळला, संसद सभागृहातही गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडमधील घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची माहिती दिली. या दुर्घटनेत चामोलीतील एक कंपनीच वाहून गेली असून 200 पेक्षा जास्त कामगार बेपत्ता आहेत. एनडीआरएफ जवानांसह वायू दलाचे जवानही सध्या येथील शोधमोहिमेत शर्थीचे प्रयत्न करत आहेत. येथील राणी गावाचा संपर्कच देशाशी तुटला आहे. त्यामुळे, एका नवजात शिशूला जन्म देणारी आई आपल्या बाळासह त्याच्या वडिलांच्या बेपत्ता होण्यामुळे काळजीत आहे. 

उत्तराखंडच्या ऋषिगंगा नदीमध्ये आलेला प्रलय हा नंदा देवी हिमकडा कोसळल्यामुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आंतरराष्ट्रीय भूगर्भ वैज्ञानिक आणि हिमकड्यांच्या तज्ज्ञांनी दुर्घटना हिमकडा तुटल्याने नाही तर भूस्खलन झाल्याने घडल्याचा दावा केला आहे. रविवारी आलेल्या महापुरानंतर रैनी गावातील पुष्पा नामक महिलेचा पती बेपत्ता आहे, त्यामुळे ती अतिशय चिंताग्रस्त आहे. रैनीसह एकूण 12 गावांचा संपर्क या महापुराच्या भीषण दुर्घटनेमुळे तुटला आहे. गावाला जोडणारा पूलही या महापुरात वाहून गेलाय. त्यावेळी, पुष्पा यांचे पती यशपाल सिंह हे त्यांच्या कामावर कार्यरत होते. यशपाल सिंह हे नदीपासूनच जवळच्या ठिकाणीच काम करत होते. त्यामुळे, आपल्या पतीच्या आणि 3 महिन्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाच्या काळजीनं पुष्पा यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. 

माझ्या तीन महिन्यांच्या बाळाच्या भविष्याचं काय? या काळजीत पुष्पा गेल्या दोन दिवसांपासून रडत आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये पुष्पा यांचं यशपालसोबत लग्न झालं होतं. तर, तीन महिन्यांपूर्वच पुष्पाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या गावांचा संपर्क तुटल्यामुळे पुष्पासह त्यांच्या शेजारील कुटुंबांकडेही खायला अन्न नाही, घराती अन्नाचा साठा संपत आला आहे.     उत्तराखंडमध्ये विविध सुरक्षा संस्थेचे जवान गेल्या चार दिवसांपासून बचाव कार्य करीत आहेत. तपोवन बोगद्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि दूरसंवेदी उपकरणांचा वापर केला जात आहे. या बोगद्यात हजारो टन चिखल मातीच्या गाळाचे ढिगारे साचले आहेत. आतापर्यंत ३४ मृतदेह सापडले असून, अन्य १७० जण बेपत्ता आहेत. बोगद्यात अडकलेल्या लोकांचा बचाव करण्यासाठी अद्ययावत उपकरणांसह उपलब्ध साधनांचा वापर केला जात आहे, असे उत्तराखंड पोलीसचे मुख्य प्रवक्ते आणि उपमहानिरीक्षक नीलेश आनंद भरणे यांनी घटनास्थळी सांगितले. 

टॅग्स :uttarakhand glacier burstउत्तराखंड हिमकडाfloodपूरDeathमृत्यू