शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
4
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
5
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
6
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
7
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
8
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
9
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
10
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
11
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
12
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
13
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
14
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
15
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
16
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
17
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
18
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
19
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
20
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सावधान... नवरा गिफ्ट आणायला विसरला, बायकोने पळवून पळवून 'धुतला'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 10:01 AM

पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे.

ठळक मुद्देपत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र फक्त साडी घेऊन पती पोहचल्याने तिचा पारा चढला. गिफ्ट न आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली आहे. 

गाझियाबाद - पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याचा घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक घटना गाझियाबादमध्ये घडली आहे. पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र फक्त साडी घेऊन पती पोहचल्याने तिचा पारा चांगलाच चढला. गिफ्ट न आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमध्ये हे दाम्पत्य राहतं. करवा चौथच्या निमित्ताने पत्नीने पतीला गिफ्ट म्हणून सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र पती फक्त नवीन साडी घेऊनच घरी आला. यामुळे पत्नी नाराज झाली आणि त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. पुढे हा वाद टोकाला गेला. संतापलेल्या पत्नीने पतीला काठीने मारायला सुरुवात केली. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीने त्याचे काहीही ऐकून घेतले नाही. गुरुवारी (17 ऑक्टोबर) सकाळी ही घटना घडल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे. 

वाद थोडा निवळल्यावर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पती-पत्नी दोघेही पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती गाझियाबादमधील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. महिन्याला जवळपास 13 हजार रुपये कमावतो. मात्र यावेळी पैसे नसल्यामुळे त्यांनी करवा चौथला पत्नीसाठी सोन्याची नथ घेतली नाही. त्याने पुढच्या वेळी नथ घेईन असं सांगितलं. मात्र संतापलेल्या पत्नीने त्याचे काहीही ऐकून न घेता वाद सुरू केला तसेच त्याला मारहाण केली आहे. या दाम्पत्याला एक चार वर्षाचा मुलगा आहे. एकमेकांविरोधात  तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दाम्पत्याची समजूत काढण्यात आली आहे. तसेच आनंदात राहण्याचा सल्ला देऊन घरी परत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. पती-पत्नीत काही कारणांमुळे वाद झाला. मात्र हा वाद मिटल्याचं भासवून पतीने पत्नीकडे फ्रेंच किस मागितला. पण फ्रेंच किस न करता पतीने पत्नीची जीभ कापली.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस