लग्नापूर्वीच पती - पत्नी करणार करार ?

By Admin | Updated: September 16, 2015 13:38 IST2015-09-16T13:38:20+5:302015-09-16T13:38:20+5:30

घटस्फोटानंतर मुलांची जबाबदारी कोणाची, महिलेला किती पोटगी द्यावी लागेलल, लग्नानंतर घरकामाची जबाबदारी कोणाची.... हे सर्व लग्नापूर्वीच ठरलं तर

Husband and wife before marriage? | लग्नापूर्वीच पती - पत्नी करणार करार ?

लग्नापूर्वीच पती - पत्नी करणार करार ?

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १६ -  घटस्फोटानंतर मुलांची जबाबदारी कोणाची, महिलेला किती पोटगी द्यावी लागेलल, लग्नानंतर घरकामाची जबाबदारी कोणाची.... हे सर्व लग्नापूर्वीच ठरलं तर आणि तेही करार स्वरुपात..केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या मंत्री मनेका गांधी आता भारतात अशी करारपद्धत सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. 

महिला व बालविकास खात्याने एक मसुदा तयार केला असून यामध्ये लग्नापूर्वीच पती - पत्नीमध्ये करार करता येईल, यात जबाबदारीचे वाटप, घटस्फोटानंतरच्या तडजोडी या सर्व मुद्द्यांचा समावेश असेल असे एका हिंदी वृत्तपत्राने म्हटले आहे. या करारामुळे लग्नानंतर घटस्फोट झाल्यास महिलेला पोटगी मिळवताना त्रास होणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महिला व बालविकास मंत्रालयाने या करार कायद्यासंदर्भातील कच्चा मसुदा तयार करुन अन्य मंत्रालयांकडे पाठवला आहे. आता त्यांच्याकडून शिफारसी व मत मागवण्यात आले आहे. भारतात लग्न ही प्रक्रिया धार्मिक विधीमध्ये गणली जाते व प्रत्येक धर्माच्या लग्नाच्या विविध पद्धती आहेत. पण यात कुठेही लग्नात कराराला मंजुरी देण्यात आलेली नाही. 

Web Title: Husband and wife before marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.