शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पती आणि दोन वर्षाच्या मुलासमोर विवाहित महिलेची गोळी झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 18:53 IST

प्रिया मेहरा असे मृत महिलेचे नाव आहे. गोळीबार झाला त्यावेळी प्रियासोबत पती पंकज आणि दोनवर्षांचा मुलगा होता.

ठळक मुद्देमेहरा कुटुंबियांची गाडी शालिमार बाग भागामध्ये असताना वेगात एक गाडी ओव्हरटेक करुन त्यांच्यापुढे जाऊन थांबली. गंभीर जखमी झालेल्या प्रियाकडे पोलीस आणि रुग्णालयाने दुर्लक्ष केले असा आरोप  मेहरा कुटुंबाने केला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या शालिमार बाग परिसरात विवाहित महिलेची  तिच्या दोन वर्षांच्या मुलासमोर गोळया झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. प्रिया मेहरा असे मृत महिलेचे नाव आहे. गोळीबार झाला त्यावेळी प्रियासोबत पती पंकज आणि दोनवर्षांचा मुलगा होता. हे कुटुंब गुरुद्वारामध्ये दर्शन घेऊन गाडीने घरी परतत असताना शालिमार बाग भागात त्यांच्यावर गोळीबार झाला. 

मेहरा कुटुंबियांची गाडी शालिमार बाग भागामध्ये असताना वेगात एक गाडी ओव्हरटेक करुन त्यांच्यापुढे जाऊन थांबली. या गाडीतून हल्लेखोर उतरले व त्यांनी थेट मेहरा कुटुंबावर गोळीबार सुरु केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळयांनी प्रियाच्या शरीराचा वेध घेतला. सुदैवाने पंकज आणि त्यांचा दोनवर्षांचा मुलगा या गोळीबारातून बचावला. प्रियाचे पती तिला लगेच नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

गंभीर जखमी झालेल्या प्रियाकडे पोलीस आणि रुग्णालयाने दुर्लक्ष केले असा आरोप  मेहरा कुटुंबाने केला आहे. प्रियाला रुग्णालयात आणले त्यावेळी सुरुवातीला डॉक्टरांनी उपचार करायला नकार दिला. पोलीस आल्यावरच आम्ही उपचार सुरु करु असे रुग्णालयाने सांगितले असे  कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्याचवेळी हद्दीच्या मुद्यावरुन पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते त्यामुळे उपचाराला आणखी विलंब लागला. दिल्लीत गुन्हेगारी मोठया प्रमाणावर वाढली असून, मागच्या तीन दिवसात पाच हत्या झाल्या आहेत. प्रिया मेहरा गृहिणी होती. पती पकंज यांचा पहाडगंज भागात बिझनेस आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हा