शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Asani Cyclone: ‘असानी’ चक्रीवादळाचा जोर आणखी वाढला; पश्चिम बंगाल, ओडिशासाठी सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 11:42 IST

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशातील किनारपट्टीवर मंगळवारपासून जोरदार वारे वाहण्याची आणि पाऊस होण्याची शक्यता आहे.  

कोलकाता/भुवनेश्वर : बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात तयार झालेले चक्रीवादळ ‘असानी’ उत्तर आंध्र प्रदेश-ओडिशाच्या दिशेने सरकल्याने रविवारी सायंकाळी चक्रीवादळ आणखीनच तीव्र झाले आहे. ओडिशा आणि  पश्चिम बंगालसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,  असे हवामान विभागाने सांगितले.

चक्रीवादळ असानी वायव्येकडे सरकले असून, पुढच्या चोवीस तासांत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात  त्याचे रूपांतर एका भीषण चक्रीवादळात होण्याची  शक्यता आहे. हे चक्रीवादळ १० मेपर्यंत वायव्येकडे आणि बंगाल उपसागराच्या वायव्य भागालगतच्या उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर अग्रेसर होण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर हे चक्रीवादळ वायव्येकडून बंगाल उपसागराच्या वायव्येकडे ओडिशा किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांन शनिवारी म्हटले होते की, चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता नाही; परंतु पूर्व किनारपट्टीच्या समांतर सरकण्याची आणि मंगळवारी सायंकाळपासून पाऊस होण्याची शक्यता आहे.हवामान विभागानुसार चक्रीवादळ किनारपट्टीवर न धडकताच पुढील आठवड्यापर्यंत कमजोर होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशातील किनारपट्टीवर मंगळवारपासून जोरदार वारे वाहण्याची आणि पाऊस होण्याची शक्यता आहे.  ओडिशाचे विशेष मदत आयुक्त पी. के. जेना यांनी सांगितले की, राज्य सरकारने बचाव मोहिमेसाठी पुरेशी व्यवस्था केली आहे.  पुरीनजीकच्या किनारपट्टीपासून १०० किलो मीटर दुरूनच हे वादळ जाणार असल्याने राज्यासाठी हे चक्रीवादळ मोठे धोकादायक नसेल. तथापि, एनडीआरएफ  ओडीआरएफ आणि अग्निशमन सेवेचे पथके कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

मंगळवारी गजपती, गंजम आणि पुरी या जिल्ह्यातील भागात पाऊस होऊ शकतो. बुधवारी गंजम, खुरदा, पुरी, जगतसिंहपूर आणि कटकमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. मंगळवार ते शुक्रवारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. कोलकाताचे महापौर फिऱ्हाद हकीम यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके सज्ज ठेवण्यात  आली आहेत. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळ