शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशावर धडकणार चक्रीवादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 02:38 IST

२४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर येत्या २४ तासांत चक्रीवादळात होणार असून, ते पुढील ७२ तासांत आंध्र प्रदेशाच्या दिशेने येऊ लागले आहे़ यामुळे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील काही दिवसांत तेथील तापमानातही वाढ होणार आहे़ येत्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.विदर्भातील अहेरी २१, कोंडागाव १०, सिरोंचा १८ मिमी पावसाची नोंद झाली होती. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता तीव्र झाला असून, त्यांचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे़ गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता हा कमी दाबाचा पट्टा श्रीलंकेतील त्रिकोमालीपासून ८३० किमी, तर चेन्नईपासून ११५० किमी आणि आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणमपासून १३३० किमी अंतरावर होता.शुक्रवारी त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार असून, त्यानंतर ते आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे़ या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर १५ डिसेंबरपासून जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच १६ डिसेंबरला अनेक ठिकाणी अतिवृष्टी (२०० मिमीपेक्षा अधिक) होण्याची शक्यता आहे़ मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ १६ डिसेंबरला हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी असण्याची शक्यता आहे़तीन राज्यांवर परिणामया चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, उत्तर तामिळनाडू, पाँडेचरी येथे होणार आहे़विदर्भात १५ ते १७ डिसेंबर दरम्यान बहुतेक ठिकाणी आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़या चक्रीवादळामुळे मराठवाड्यातील अनेक ठिकाणी आकाश ढगाळ राहणार असून, तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे़

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशweatherहवामान