काश्मिरात त्रिशंकू; झारखंडमध्ये भाजपा

By Admin | Updated: December 24, 2014 03:07 IST2014-12-24T03:07:57+5:302014-12-24T03:07:57+5:30

झारखंडच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट कौल दिला. पण जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीला सर्वाधिक जागा

Hung in Kashmir; BJP in Jharkhand | काश्मिरात त्रिशंकू; झारखंडमध्ये भाजपा

काश्मिरात त्रिशंकू; झारखंडमध्ये भाजपा

श्रीनगर/ रांची : झारखंडच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट कौल दिला. पण जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीला (पीडीपी) मिळालेल्या सर्वाधिक जागाही सत्तास्थापनेसाठी पुरेशा नसल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा काबीज केल्यानंतर झारखंडमध्येही भाजपा सत्तेच्या दारात आहे. तेथे भाजपा-अखिल झारखंड विद्यार्थी मोर्चा पक्ष (एजेएसयूपी) यांची युती सत्तेवर येईल. झारखंडमधील यशाने मोदींच्या लोकप्रियतेवर पुन्हा मोहर उमटली असली, तरी जम्मू वगळता काश्मीरच्या खोऱ्याने साथ न दिल्याने तेथे मोदींचे मिशन-४४ असफल झाले. या परिस्थितीत पीडीपी कोणाच्या साथीने सरकार बनविणार, हा औत्सुक्याचा विषय बनला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात जास्त २८ जागा जिंकणाऱ्या पीडीपीला बहुमतासाठी अन्य पक्षांची मदत घेणे अपरिहार्य आहे. शिवाय २५ जागा मिळालेली भाजपाही सर्व पर्यायांचा अवलंब करीत सरकार स्थापण्याचा दावा करण्याच्या मन:स्थितीत आहे.

> ओमर अब्दुल्ला एका ठिकाणी पराभूत; दुसरीकडे निसटता विजय
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना सोनावर मतदारसंघात पराभवाचा झटका बसला, पण बीरवा या दुसऱ्या जागी ते केवळ एक हजार मतांच्या फरकाने विजय मिळवू शकले. काँग्रेसची चौथ्या जागेपर्यंत घसरण झाली. सज्जाद लोण यांच्या जम्मू-काश्मीर पीपल कॉन्फरन्सने (जेकेपीडीएफ) दोन, तर सीपीआयएमने एक जागा मिळविली.

पीडीपीसमोर तीन पर्याय
१ काँग्रेस आणि इतर अपक्षांची मदत घेणे
२भाजपाला सत्तेत सहभाग देणे
३नॅशनल कॉन्फरन्सशी हातमिळवणी करून अपक्षांची मदत घेणे

Web Title: Hung in Kashmir; BJP in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.