साडेनऊ हजारांवर हेक्टरला तडाखा वादळी पाऊस : पंचनामे अजून सुरूच

By Admin | Updated: September 16, 2015 23:38 IST2015-09-16T23:38:07+5:302015-09-16T23:38:07+5:30

जळगाव- जिल्हाभरात १० ते १३ सप्टेंबर या दरम्यान झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरूच आहेत. कृषि विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल मंगळवारी प्रशासनाला दिला असून, त्यात विविध पिकांचे सुमारे नऊ हजार ८७५ हेक्टवरला तडाखा बसल्याचे म्हटले आहे. जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, बोदवड, बोदवड, अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, जामनेर, चोपडा या तालुक्यांमध्ये नुकसान झाले आहे. तर मुक्ताईनगर, चाळीसगाव, पाचोरा व भडगाव या तालुक्यांना मात्र वादळी पावसाचा तडाखा बसलेला नसल्याचे कृषि विभागाने म्हटले आहे.

Hundreds of thousands of hectare damaged turbulent rain: Panchnama is still going on | साडेनऊ हजारांवर हेक्टरला तडाखा वादळी पाऊस : पंचनामे अजून सुरूच

साडेनऊ हजारांवर हेक्टरला तडाखा वादळी पाऊस : पंचनामे अजून सुरूच

गाव- जिल्हाभरात १० ते १३ सप्टेंबर या दरम्यान झालेल्या वादळी पावसासह गारपीटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे सुरूच आहेत. कृषि विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल मंगळवारी प्रशासनाला दिला असून, त्यात विविध पिकांचे सुमारे नऊ हजार ८७५ हेक्टवरला तडाखा बसल्याचे म्हटले आहे. जळगाव, भुसावळ, रावेर, यावल, बोदवड, बोदवड, अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव, जामनेर, चोपडा या तालुक्यांमध्ये नुकसान झाले आहे. तर मुक्ताईनगर, चाळीसगाव, पाचोरा व भडगाव या तालुक्यांना मात्र वादळी पावसाचा तडाखा बसलेला नसल्याचे कृषि विभागाने म्हटले आहे.
नुकसानीची अंतिम आकडेवारी येईपर्यंत ही आकडेवारी आणखी वाढेल. वादळी पावसामुळे १२ हजार ६१६ शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
सर्वाधिक नुकसान जामनेरात
जामनेर तालुक्यात तीन हजार ४३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ जळगाव तालुक्यात दोन हजार ९६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

नुकसानीची माहिती
तालुका बाधित गावे बाधित शेतकरी क्षेत्र (हेक्टर)
जळगाव २३ ३७८६ २९६४.८०
भुसावळ २ ८२ ३४
रावेर १३ १२०० ६५८
यावल ६९ ९४ ७५.७०
बोदवड १३ १४५ १८५
अमळनेर ५ ५४५ ३९१
पारोळा ६ ११४५ ५५३
एरंडोल १७ १४१७ ४६०
धरणगाव १३ १२५९ ९०३
जामनेर१५ २५०० ३४३०
चोपडा१२ ४४३ २२१.४०

Web Title: Hundreds of thousands of hectare damaged turbulent rain: Panchnama is still going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.