‘एटीएम’साठी आणलेले दीड कोटी लुटले!
By Admin | Updated: November 30, 2014 02:08 IST2014-11-30T02:08:09+5:302014-11-30T02:08:09+5:30
व्हॅनमधील दीड कोटींची रक्कम दोन अज्ञात हल्लेखोरांनी लुटून एटीएमच्या सुरक्षा जवानाला ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.

‘एटीएम’साठी आणलेले दीड कोटी लुटले!
नवी दिल्लीतील घटना : दुचाकीवर आलेल्या लुटारूंनी सुरक्षारक्षकाला घातल्या गोळ्या
नवी दिल्ली : उत्तर दिल्लीतील कमलानगर भागात असलेल्या खाजगी बँकेच्या एटीएममध्ये नोटांचा भरणा करण्यास आलेल्या व्हॅनमधील दीड कोटींची रक्कम दोन अज्ञात हल्लेखोरांनी लुटून एटीएमच्या सुरक्षा जवानाला ठार केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 च्या सुमारास एटीएममध्ये नोटांचा भरणा करण्यासाठी ही व्हॅन आली असता, मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी सुरक्षा जवानावर हल्ला चढविला. सुरक्षा जवानाने त्यांचा हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोराने त्याच्यावर गोळीबार केला. त्यांनी यावेळी व्हॅनमधील रोख रकमेच्या सुरक्षा रक्षकालाही ठार करण्याची धमकी देऊन दीड कोटींची रक्कम ठेवलेली बॅग लंपास केली. सुरक्षा जवानाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
च्पोलीस या एटीएममधील व अन्य ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून या हल्लेखोरांचा तपास करीत आहेत.
च्पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज प्राप्त केले आहे. मात्र अद्याप आरोपींची ओळख पटवता आलेली नाही.