भांडूप येथे बोगस कंपनी थाटून लाखोंची फसवणूक

By Admin | Updated: May 16, 2014 00:36 IST2014-05-15T19:26:28+5:302014-05-16T00:36:19+5:30

बोगस कंपनी थाटून गुंतवणूकदारांना वर्षभरात दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष देऊन गंडा घालणार्‍या मनोज सोंडे (३३) या ठगाला भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Hundreds of millions of cheating frauds in bogus company at Bhandup | भांडूप येथे बोगस कंपनी थाटून लाखोंची फसवणूक

भांडूप येथे बोगस कंपनी थाटून लाखोंची फसवणूक

>मुंबई : बोगस कंपनी थाटून गुंतवणूकदारांना वर्षभरात दुप्पट पैसे मिळवून देण्याचे आमिष देऊन गंडा घालणार्‍या मनोज सोंडे (३३) या ठगाला भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 
भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये मनोजने कुसुम प्रिन्स लिमिटेड या बोगस कंपनीचे कार्यालय थाटले होते. या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांना वर्षभरातच गुंतवणूकीची रक्कम दुप्पट करून देण्याचे आश्वासन दिले जात होते. मनोजच्या य आमिषाला बळी पडत अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र दिड महिन्यांपूर्वी काहीही पूर्वसूचना न देता कार्यालयाला कुलूप ठोकून मनोजने पळ काढला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अरूण जाधव या गुंतवणूकदाराने मनोजविरोधात भांडूप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी भांडूप पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध सुरु केला. मनोज अनेक गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घालून पोबारा केला होता. मंगळवारी माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोज सांगली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भांडूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेश पाटणकर, पोलिस नाईक विवेक आडकर, संजय गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून मनोजला अटक केली. सांगलीला मनोज आपल्या पत्नीसोबत राहून एका खाजगी कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 
 

Web Title: Hundreds of millions of cheating frauds in bogus company at Bhandup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.