होंडा येथे दिवसाढवळ्या चोरी 72 हजारांचे दागिने लंपास

By Admin | Updated: September 8, 2015 02:08 IST2015-09-08T02:08:44+5:302015-09-08T02:08:44+5:30

होंडा : आज दुपारी दिवसाढवळ्या अज्ञात चोराने जोशी कुटुंबियांच्या घरात घुसून वयस्कर जोडप्याला जबर मारहाण करत दागिन्यांची चोरी केली़ चोरट्याच्या मारहाणीत गोपाळकृष्ण विष्णू जोशी या 62 वर्षीय इसमाच्या तोंडाला मार बसला आहे तर त्यांची पत्नी शीतल जोशी याही जखमी झाल्या आहेत़ दोघांनाही साखळी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले आह़े

Hundreds of jewelery stolen in Honda on day-to-day basis | होंडा येथे दिवसाढवळ्या चोरी 72 हजारांचे दागिने लंपास

होंडा येथे दिवसाढवळ्या चोरी 72 हजारांचे दागिने लंपास

ंडा : आज दुपारी दिवसाढवळ्या अज्ञात चोराने जोशी कुटुंबियांच्या घरात घुसून वयस्कर जोडप्याला जबर मारहाण करत दागिन्यांची चोरी केली़ चोरट्याच्या मारहाणीत गोपाळकृष्ण विष्णू जोशी या 62 वर्षीय इसमाच्या तोंडाला मार बसला आहे तर त्यांची पत्नी शीतल जोशी याही जखमी झाल्या आहेत़ दोघांनाही साखळी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले आह़े
शीतल जोशी हिच्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील बांगड्या मिळून जवळपास 72 हजारांची चोरी करण्यात आली आह़े सदर प्रकारामुळे होंडा भागात घबराट पसरली आह़े या संबंधीची गोपाळकृष्ण जोशी यांनी वाळपई पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आह़े वाळपई-होंडा मार्गाशेजारी ़़़ मंदिराशेजारी सदर जोशी कुटुंब राहत आह़े गोपाळकृष्ण जोशी यांचे वर 62 तर त्यांची पत्नी शीतल जोशी हिचे वय 55 एवढे आह़े आज दुपारी 3 वा़ अज्ञात इसम अचानक घरात घुसला व दोघांनाही मारहाण करून शीतल जोशी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील पाटली हिसकावून घेत पलायन केला़ सदर प्रकार अचानकपणे घडल्याने संभ्रमित झाल्याने त्यांना आरडाओरड करता आली नाही़ दोघांनीही या प्रकारात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तो अयशस्वी ठरला आह़े संशयित इसम जवळपास 35-40 वयोगटातील असल्याचा अंदाज आह़े त्याने दोघांनाही केली़ गोपाळकृष्ण जोशी यांच्या तोंडाला मार बसला आह़े त्यांना साखळी सार्वजनिक रुग्णालयात प्राथमिक उपचाराअंती घरी पाठविण्यात आले आह़े
दरम्यान सदर प्रकार घडल्यानंतर जोशी दाम्पत्याने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर घरासमोरून जाणार्‍या पुष्पा रमाकांत मयेकर हिने घरात शिरण्याचा प्रयत्न केला असता सदर इसमाने तिच्याही गळ्यातील माळेवर हात मारून हिसकावून नेण्याचा प्रकार घडला़ तद्नंतर हा धडधाकड इसम एका दुचाकीवरून वाळपईच्या दिशेने पसार झाला, अशी माहिती पुष्पा मयेकर हिने वाळपई पोलिस स्थानकावर दिलेल्या जबानीत नमूद करण्यात आली आह़े
वाळपई पोलिसांनी या संबंधीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला आह़े प्रकरणाचा तपास सुरू आह़े दरम्यान होंडासारख्या लोकवस्तीने दाटलेल्या भागात असा चोरीचा प्रकार दिवसाढवळ्या घडल्याने भागात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आह़े महत्त्वाचे म्हणजे या भागात दिवसेंदिवस वाढणारी परप्रांतीयांचा ़़़़़ व गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या खनिज खाणीचा व्यवसाय यांच्या पार्श्वभूमीवर चोर्‍यांचे प्रमाण हळूहळू वाढण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही़
(वार्ताहर)

फोटो : वाळपई पोलिस स्थानकावर जबानी नोंद करताना पुष्पा रमाकांत मयेकऱ

Web Title: Hundreds of jewelery stolen in Honda on day-to-day basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.