शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पश्चिम त्रिपुराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा, 382 घरांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 10:15 IST

पश्चिम त्रिपुराला बुधवारी (16 मे) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. पावसामुळे 300 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे.

ठळक मुद्देपश्चिम त्रिपुराला बुधवारी (16 मे) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. पावसामुळे 300 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

आगरतळा - पश्चिम त्रिपुराला बुधवारी (16 मे) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. पावसामुळे 300 हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळामुळे तब्बल 382 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच आगरतळा महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी पाणी साचले आहे. 

राज्याचे मुख्य सचिव एल. के. गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पश्चिम त्रिपुरातील या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ज्या ठिकाणी पाणी साचले आहे तेथे पाण्याच्या योग्य पद्धतीने निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याचे आदेश दिले आहेत. अनेक ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पश्चिम त्रिपुरातील या परिस्थितीवर सरकारचे लक्ष आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने विजेच्या खांबावर झाडं उन्मळून पडल्याने खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच सरकारचे या स्थितीवर लक्ष असून त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य त्या सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. बुधवारी सरासरी 19.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Cyclone Fani : ओडिशामध्ये फनीचा तडाखा; आत्तापर्यंत 64 जणांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला होता. 64 जणांचा वादळाच्या तडाख्यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. 3 मे रोजी ओडिशा येथे 240 किमी प्रतितास वेगाने आलेल्या चक्रीवादळात जवळपास 241 जण जखमी झाले आहेत. शनिवारपर्यंत मृतांचा आकडा 43 वर होता तो वाढून आता 64 झाला आहे. पुरी जिल्ह्याशिवाय खुर्दा जिल्ह्यात 9 जण, कटक जिल्ह्यात 6, मयूरभंजमध्ये 4, केंद्रपाडा आणि जाजपुर येथे प्रत्येकी 3 जणांचा मृत्यू झाला.

ओडिशातील पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले होते. वीज पूरवठा खंडीत झाला होता. फनी या चक्रीवादळाचा फटका 1 कोटी 50 लाख नागरिकांना बसला आहे. सरकारकडून 12 मे पर्यंत वीजपूरवठा पूर्ववत होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे पुरी, अंगुल, मयूरगंज, केंद्रपाडा या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. ओडिशामध्ये 1999 मध्ये आलेल्या सुपर सायक्लोनमध्ये राज्यातील 10 हजारपेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला होता. याआधी 2018 मध्ये आलेल्या तितली वादळात 60 लोकांचा मृत्यू झाला होता तर 2013मधील फालिन वादळात 44 लोकांचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :Tripuraत्रिपुराRainपाऊस