अंजनेरी शिवारात दीड लाखाचा मद्यसाठा जप्त
By Admin | Updated: September 3, 2015 23:52 IST2015-09-03T23:52:34+5:302015-09-03T23:52:34+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरकडे येणारा अवैध दारूसाठा पोलिसांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात एका मारुती व्हॅनमधून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अंजनेरी शिवारात दीड लाखाचा मद्यसाठा जप्त
त र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरकडे येणारा अवैध दारूसाठा पोलिसांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात एका मारुती व्हॅनमधून ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे अवैधरीत्या दारूसाठा येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, उपअधीक्षक रामेश्वर वैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय उंबरकर, त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पो. ना. महेश घायतड, अशोक काळे यांनी बेजे फाट्यावर सापळा रचून यावेळी नाशिककडून येणारी मारुती व्हॅन (एम.एच.-१५-सी.एस.८७९५) थांबविली असता मोठ्या प्रमाणावर देशी दारू व इंग्लिश दारू गाडीत आढळून आली.सदर व्हॅनला त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. याठिकाणी मारुतीची चौकशी केली. या मारूती व्हॅनमधून देशी दारू (प्रिन्ससंत्रा) २१६० बाटल्या. मॅगडोल-१८, ब्लॅक डी.एस.पी.१५, ऑफिसर चॉइस-४०, बॅकपायपर-४० आदिंसह ५० हजारांचा मुद्देमाल सापडला आहे.याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश कन्हैयालाल खैमानी यास अटक केली आहे. दरम्यान हा अवैध दारूसाठा कुठून आला व कुठे जाणार होता याचा पोलीस तपास करीत आहे.----------कॅप्शनपोलिसांनी पकडलेल्या अवैध दारूसाठा प्रसंगी उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, हवालदार संजय उंबरकर, पो. ना. महेश घायतड, अशोक काळे, राजू दिवटे आदि.----