सातव चौकात गुंडांचा हैदोस सायकल शॉपमध्ये तोडफोड, एकावर तलवारीने हल्ला
By Admin | Updated: July 1, 2014 23:55 IST2014-07-01T23:55:49+5:302014-07-01T23:55:49+5:30
अकोला: सातव चौकामध्ये चिखलपुर्यातील ८ ते १0 गुंडांच्या टोळीने हैदोस घालून परिसरात दहशत निर्माण करून भिसे सायकल शॉपमध्ये तोडफोड केली. सायकल शॉपमधील एका जणाच्या अंगावर तलवारीने वार करून त्याला जखमी केले. ही घटना रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली.

सातव चौकात गुंडांचा हैदोस सायकल शॉपमध्ये तोडफोड, एकावर तलवारीने हल्ला
अ ोला: सातव चौकामध्ये चिखलपुर्यातील ८ ते १0 गुंडांच्या टोळीने हैदोस घालून परिसरात दहशत निर्माण करून भिसे सायकल शॉपमध्ये तोडफोड केली. सायकल शॉपमधील एका जणाच्या अंगावर तलवारीने वार करून त्याला जखमी केले. ही घटना रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली. दिवेकर आखाड्याजवळ राहणारे राजेश मनोहर भिसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सातव चौकात भिसे सायकल शॉप आहे. मंगळवारी सकाळी त्यांचे भाऊ उमेश भिसे यांचा चिखलपुर्यातील गुंड दीपक पहूरकर याने दीड लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात दीपकने उमेशला मारहाण केली. त्यानंतर उमेशने रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मंगळवारी रात्री ८.३0 वाजता सुमारास दीपक पहूरकर हा ८ ते १0 युवकांना घेऊन सातव चौकात आला. त्याने राजेश भिसे यांच्या दुकानात घुसून त्यांच्या दुकानातील सायकली व इतर साहित्य फेकून दिले आणि राजेश भिसे यांच्यावर तलवारीने वार करून त्यांना जखमी केले. राजेश यांना तातडीने सवार्ेपचार रुग्णालयात दाखल केले. गुंडांनी घातलेल्या हैदोसामुळे परिसरातील नागरिक व व्यावसायिक घाबरून गेले होते. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शिवा ठाकूर व ताफा घटनास्थळी पोहाचला. पोलिसांनी चौकात बंदोबस्त लावला. रात्री उशिरा पोलिसांनी दीपक पहूरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२६, ४२७, ४५२, ५0६(३४) नुसार गुन्हा दाखल केला. बॉक्स: दररोज नवीन गंुडांची भरशहरामध्ये दररोज नवीन गुंड उदयास येत आहे. या गुंडांच्या टोळीने शहरातील नागरिक, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. खंडणी मागण्याचे प्रकार या टोळ्याकडून सातत्याने घडत आहेत; मात्र पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे या गुंडांचे मनोबल वाढले आहे. जठारपेठ परिसरात रिपाइं युवक आघाडीचा शहराध्यक्ष गोपाल कदम, अनिकेत अबगड या गुंडांची दहशत आहे. आता पाच महिन्यांपूर्वी मुंबईवरून आलेल्या दीपक पहूरकर या गुंडाने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. बिल्डर, व्यावसायिक खंडणी वसूल करण्याचा गोरखधंदाच या टोळीने सुरू केला.