नम्रताचा शवविच्छेदन अहवाल
By Admin | Updated: July 9, 2015 04:14 IST2015-07-09T00:01:06+5:302015-07-09T04:14:24+5:30
मृत्यूच्या तीन वर्षांनंतर नम्रता डामोरचा शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक झाला आहे. या अहवालानंतर या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यास मध्यप्रदेश पोलिसांना भाग पडले आहे

नम्रताचा शवविच्छेदन अहवाल
मृत्यूच्या तीन वर्षांनंतर नम्रता डामोरचा शवविच्छेदन अहवाल सार्वजनिक झाला आहे. या अहवालानंतर या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यास मध्यप्रदेश पोलिसांना भाग पडले आहे. नम्रताचा मृत्यू ‘हिंसकरीत्या गळा आवळल्याने’ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालावर ९ जानेवारी २०१२ ही तारीख आहे.
मृत्यूपूर्वी नम्रतावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करून याची शहानिशा करण्यासाठी ‘हिस्टोपॅथॉलॉजिकल’ चाचणीचा सल्ला देण्यात आला होता. नम्रताचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. पुरोहित यांनी बुधवारी या वृत्तास दुजोरा दिला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाले त्यावेळी ओळख पटलेली नव्हती. मृतदेहाच्या चेहऱ्यावर तीन ठिकाणी नखांचे ओरखडे होते. आत्महत्येचा उल्लेख अहवालात नव्हताच, असे पुरोहित यांनी सांगितले.
-----------------------
अक्षय सिंग यांचा व्हिसेरा सीएफएसएलकडे
४व्यापमं घोटाळा आणि याच्याशी संबंधित मृत्यू प्रकरणांचा तपास करताना आपला जीव गमावणारे वृत्तवाहिनी पत्रकार अक्षय सिंग यांचा व्हिसेरा तपासणीसाठी सेंट्रल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्याचा निर्णय भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) घेतला आहे. कुठल्याही प्रकारचे विषाचे अंश वा आजाराची माहिती याद्वारे होऊ शकेल.