भारताची मानवता; पाकच्या नागरिकाला रेंजर्सकडे सोपविले
By Admin | Updated: April 27, 2017 01:14 IST2017-04-27T01:14:36+5:302017-04-27T01:14:36+5:30
गफलतीने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बुधवारी पाकिस्तान

भारताची मानवता; पाकच्या नागरिकाला रेंजर्सकडे सोपविले
गुरदासपूर : गफलतीने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बुधवारी पाकिस्तान रेंजर्सच्या स्वाधीन केले. पाकच्या नैनकोट येथील रहिवासी निशार अहमद अन्सारी गफलतीने सीमा ओलांडून इकडच्या बाजूला आले होते.
कासोवाल सीमा चौकीवर तैनात जवानांनी त्यांना अटक केली होती. अन्सारी गफलतीने सीमा ओलांडून भारतात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बीएसएफने पाकिस्तानी रेंजर्सशी संपर्क साधून मानवतेच्या आधारे मंगळवारी सायंकाळी अन्सारी यांना त्यांच्या स्वाधीन केले.
कुलभूषण जाधव यांना राजनैतिक मदत घेऊ देण्याची भारताची मागणी पाकने फेटाळली असताना भारताने रस्ता चुकलेल्या पाकिस्तानी नागरिकाला मायदेशी परत पाठवून मानवतेचा वस्तुपाठ घालून दिला आहे.