शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा जबरदस्त प्रकल्प, आता स्टेशन परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्यातून होणार लाखोंची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:21 IST

रेल्वे स्थानकांच्या परिसरात आणि रेल्वे रुळांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. त्यामुळे मोठी समस्य निर्माण होते.

भारतीय रेल्वेनं अत्याधुनिकतेची कास धरली आहे. याच अंतर्गत आता रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागानं नव्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे स्थानकांच्या परिसरात आणि रेल्वे रुळांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात होते. यात आता एका अनोख्या प्रकल्पाची सुरुवात दिल्ली विभागाकडून केली जाणार आहे. यात दिल्ली विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३० रेल्वे स्थानकांवरील कचरा गोळा केला जाणार आहे. 

रेल्वेच्या या अभिनव प्रकल्पात बहुतांश दिल्ली एनसीआर भागातील रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या रेल्वे स्थानकांवरील कचरा जमा करुन त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे आणि यातून रेल्वेच्या दिल्ली विभागाला १० लाखांची मिळकत मिळणार आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकल्पाअंतर्गत रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापनात सुधारणा होणार आहे. 

रेल्वेच्या या प्रकल्पासाठी लाहरी गेट येथे रेल्वेकडून मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी फॅक्ट्री उभारण्यात आली आहे. या प्लांटमध्ये ३० रेल्वे स्थानकांवर जमा होणाऱ्या कचऱ्यावर सुयोग्य पद्धतीनं प्रक्रिया केली जाणार आहे. यात ओला आणि सुखा कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर वेगवेगळ्या प्रवर्गाअंतर्गत कचऱ्याची वर्गवारी केली जाणार आहे. यातून बायोडिग्रेडेबल भाग कंपोस्ट करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. तर सुका कचरा व्यवस्थापनासाठी वेगळी प्रक्रिया केली जाणार आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लास्टिकच्या कचऱ्याला सीपीसीबीच्या माध्यमातून सात वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये वेगळं केलं जाणार आहे. त्यानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळानं निर्धारित केलेल्या अधिकृत वेस्ट टू एनर्जी प्लांटमध्ये हा कचरा पाठवण्यात येणार आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेdelhiदिल्लीIndian Railwayभारतीय रेल्वे