‘हुडहुड’ थंडावले!

By Admin | Updated: October 14, 2014 02:13 IST2014-10-14T02:13:18+5:302014-10-14T02:13:18+5:30

ओडिशाच्या किनारपट्टीवरच्या 12 जिल्ह्यांमधील लाखो नागरिकांचे जनजीवन हुडहुड या चक्रीवादळाने गेल्या दोन-तीन दिवसांत अस्ताव्यस्त करून टाकले आहे.

Hudhud stops! | ‘हुडहुड’ थंडावले!

‘हुडहुड’ थंडावले!

आंध्रातील मृत्युसंख्या 21 : मदतकार्याला वेग
विशाखापट्टणम/भुवनेश्वर : ताशी 17क् ते 18क् किलोमीटर वेगाने वाहणारा झंझावाती वारा व वादळी पावसाच्या तडाख्याने झोडपून काढलेल्या आंध्र व ओडिशाच्या किनारपट्टीवरच्या 12 जिल्ह्यांमधील लाखो नागरिकांचे जनजीवन हुडहुड या चक्रीवादळाने गेल्या दोन-तीन दिवसांत अस्ताव्यस्त करून टाकले आहे. 
आता या वादळाचा जोर कमी झाला असला तरी त्याच्या झंझावातापायी 1क् हजारांहून अधिक नागरिक बेघर झाले असून, 5क् हजारांहून अधिक घरांची पडझड झाली आहे. याव्यतिरिक्त विद्युतपुरवठा खंडित होणो, रस्ते उखडणो या बाबींनाही नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशात या चक्रीवादळात मृत्युमुखी पडणा:यांची संख्या 21 झाली आहे.
या चक्रीवादळाने आपला मोहरा छत्तीसगडकडे वळविला असून, ते या कमी दबावाच्या प्रदेशात धीमे पडले आहे.
विशाखापट्टणमव्यतिरिक्त उत्तर आंध्रमधील श्रीकाकुलम, विजयनगरम व पूर्व गोदावरी हे जिल्हे तर ओडिशात गजपती, कोरापुट, मलकानगिरी व रायगडला या वादळाचा फटका बसला आहे. या दोन्ही राज्यांत पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. केंद्र सरकार या दोन्ही राज्यांमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण मंगळवारी विशाखापट्टणमचा दौरा करणार असल्याचे घोषित केले आहे. या वादळामुळे आंध्र व ओडिशातील बसगाडय़ा व रेल्वे रद्द करण्यात आल्या होत्या तर काहींचे मार्ग बदलण्यात आले होते. 
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हुडहुडने छत्तीसगड राज्यात प्रवेश केल्यानंतर त्याचा जोर ओसरला असून, ते आता उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत ओडिशाच्या काही भागात मेघगजर्नेसह मुसळधार वृष्टीची शक्यता आहे. तसेच ओडिशाच्या किनारपट्टीवर 7क् -8क् कि.मी. प्रति तास या वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. कोळ्य़ांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. 

 

Web Title: Hudhud stops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.