शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

HP Opinion Poll 2022: हिमाचलमध्ये तुटणार 37 वर्षांचा विक्रम? सर्व्हेत जनतेनं सांगितला आपला मूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 19:31 IST

भाजपशासित हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशात निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात या निवडणुकीसंदर्भातील तारखांची घोषणा केली. भाजपशासित हिमाचल प्रदेशात १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यातच, सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी ओपिनियन पोल घेतला आहे. हिमाचल प्रदेशात गेल्या 37 वर्षांपासून एकदा भाजप आणि एकदा काँग्रेसचे सरकार येते. येथील लोक दर पाच वर्षांनंतर सरकार बदलतात.

जयराम ठाकूर यांच्या कामावर किती लोक खूश?ओपिनियन पोलनुसार, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या कामावर बहुतांश लोक खूश आहेत. मुख्यमंत्र्यांचे काम कसे आहे, यावर ३८ टक्के लोकांनी ‘चांगले’ असल्याचे म्हटले आहे. 29 टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांचे काम सरासरी तर 33 टक्के लोकांनी खराब असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच एकूण 71 टक्के लोक मुख्यमंत्र्यांच्या कामावर समाधानी आहेत.

कुठल्या पक्षाला किती टक्के मते?सी-व्होटरच्या ओपनियन पोलनुसार, हिमाचलमध्ये तब्बल 37 वर्षांपासून सरकार बदलण्याची प्रथा यावेळी तुटण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार भाजपला 46 टक्के मते मिळू शकतात. काँग्रेसला 35.2% मते मिळू शकतात. आम आदमी पक्षाला केवळ 6.3 टक्के मतांवरच समाधान मानावे लागू शकते. तर इतरांना 12.5 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

कुठल्या पक्षाला किती जागा? -ओपिनियन पोलनुसार, हिमाचलमध्ये भजपला 38-46 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 20-28 जागांवर विजय होण्याचा अंदाज आहे. आम आदमी पक्षाला केवळ 0-1 जागेवरच समाधान मानावे लागू शकते. तर इतरांच्या खात्यात 0-3 जागा जाऊ शकतात.

मुख्यमंत्र्यांच्या रुपात पहिली पसंती कुणाला? - सर्वेक्षणात, मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या पसंतीसंदर्भात विचारले असता, 32 टक्के लोकांनी जय राम ठाकूर सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. 26 टक्के लोकांनी अनुराग ठाकूर यांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडे असे म्हटले आहे. काँग्रेस नेत्या प्रतिभा सिंह यांना 18 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 24 टक्के लोकांनी इतर चेहरा बघायला आवडेल असे म्हटले आहे.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदी