शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: हाऊ इज द जोश? पंतप्रधान मोदींचा 'उरी' स्टाईल संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 19:20 IST

उरी चित्रपटातील डायलॉग म्हणत मोदींचा चित्रपटसृष्टीतील मान्यवरांशी संवाद

मुंबई: भारतीय चित्रपटाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधला. सरकार पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी मोदींनी उरी चित्रपटातील डायलॉगदेखील म्हटला. 'हाऊ इज द जोश?' हा अभिनेता विकी कौशलचा डायलॉग म्हणत मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. भारतीय लष्करानं 2016 मध्ये पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक केला. उरीतील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यावर आधारित उरी चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. याच चित्रपटातील डायलॉग म्हणत मोदींनी राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्यांशी संवाद साधला. मोदींनी 'हाऊ इज द जोश', म्हणताच उपस्थितांनी 'हाय सर' म्हणत प्रतिसाद दिला. यावेळी टाळ्यांचा कडकडाटही झाला. यानंतर तुमच्या या नव्या जोशाची सध्या देशात सर्वत्र चर्चा आहे. नव्या भारतासाठी तुमचा हा जोश खूप महत्त्वाचा आहे, असं मोदी म्हणाले.सिनेमॅटोग्राफी कायद्यात बदल करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. पायरसी रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. देशातील गरिबीबद्दलचे चित्रपट आपण आजवर पाहिले आहेत. मात्र आता प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटांमधून समस्यांसोबतच त्यांचं निराकरण कसं करता येईल, याचं चित्रणदेखील केलं जातं, असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUri Movieउरीcinemaसिनेमाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक