हावडा-मुंबई मार्ग दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:53+5:302015-01-23T01:05:53+5:30
हावडा-मुंबई मार्ग दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच

हावडा-मुंबई मार्ग दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच
ह वडा-मुंबई मार्ग दुसऱ्या दिवशीही विस्कळीतचप्रवाशांची गैरसोय : तीन रेल्वेगाड्या केल्या रद्दनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात पानपोस-कलुंगा रेल्वेस्थानकादरम्यान स्थानिक समस्यांसाठी नागरिकांनी रेलरोको आंदोलन केल्यामुळे अनेक गाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. दरम्यान तीन रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतुक यामुळे दिवसभर विस्कळीत होती.रेल रोको आंदोलनामुळे १२६४८ निजामुद्दीन-कोईंबतूर कोंगु एक्स्प्रेस ३ तास, १२५८९ गोरखपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस १५ तास, १२७६८ संत्रागाछी-नांदेड एक्स्प्रेस २२ तास, १६०३२ जम्मूतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस ६ तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस १०.३० तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ३ तास, १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस ९ तास, १२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस ५ तास, १२२९६ पटणा-बेंगळुरु संघमित्रा एक्स्प्रेस ५.३० तास उशिराने धावत आहे. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना तासन्तास रेल्वेगाड्यांची वाट पाहत रेल्वेस्थानकावर बसण्याची पाळी आली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुम फुल्ल झाल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)...............तीन रेल्वेगाड्या झाल्या रद्ददरम्यान रेल रोको आंदोलनामुळे हावडा मुंबई मार्गावरील तीन रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यात १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस आणि १२२६१ मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दरम्यान या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इतर गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाकडूून घेण्याची पाळी आली......