शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Howdy Modi : हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 08:10 IST

हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसने नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देहाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचे नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन असल्याचा काँग्रेसचा आरोप नरेंद्र मोदीजी तुम्ही अमेरिकेत आमचे पंतप्रधान म्हणून गेला आहात, निवडणुकीचे प्रचारक म्हणून नाही

नवी दिल्ली - अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हाऊडी मोदी कार्यक्रम रविवारी रात्री ह्युस्टनमध्ये दणक्यात संपन्न झाला. या कार्यक्रमातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. दरम्यान, हाऊडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसनेनरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम म्हणजे परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमावेळी नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्याची स्तुती केली होती. तसेच ''अबकी बार ट्रम्प सरकार'' असे म्हणत मोदी यांनी येत्या अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले होते. मोदींच्या याच विधानाला काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी मोदींचे हे वक्तव्य म्हणजे परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. ''अन्य देशाच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाचे उल्लंघन केले आहे. नरेंद्र मोदीजी तुम्ही अमेरिकेत आमचे पंतप्रधान म्हणून गेला आहात, निवडणुकीचे प्रचारक म्हणून नाही.''असा टोला आनंद शर्मा यांनी मोदींना लगावला. 

अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये एनआरजी स्टेडिअममध्ये हाऊडी मोदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांसमोर ट्रम्प यांची स्तुती केली होती. ''आज आमच्यासोबत एक खास पाहुणे आले आहेत. त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही. कारण त्यांना पृथ्वीवर राहणारा प्रत्येक माणूस ओळखतो. त्यांचे नाव जागतिक राजकारणात प्रत्येकवेळी घेतले जाते. त्यांना करोडो लोक फॉलो करतात. भारताचे चांगले मित्र अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये असल्याचा अभिमान असल्याचे, मोदी म्हणाले होते. यावेळी मोदी यांनी ट्रम्प यांची स्तुती केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा चाहता आहे. ते अमेरिकेला पुन्हा महान बनवायाला निघाले आहेत. त्यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करून दाखविले आहे. त्याच्याबद्दल आपलेपणा वाटत असल्याने मी कायम म्हणतो, ''अबकी बार ट्रम्प सरकार'' असे म्हणत मोदी यांनी येत्या अमेरिकेतील निवडणुकीत ट्रम्प यांना मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले होते.  

टॅग्स :Howdy Modiहाऊडी मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीUnited Statesअमेरिकाcongressकाँग्रेस