शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Howdy Modi: ह्यूस्टनमधील पंतप्रधान मोदींच्या भाषाणातील प्रमुख 10 मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 09:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित केले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित केले.  यावेळी पंतप्रधान मोदींनी जम्मू- काश्मीर, दहशतवाद, दहशतवादावरील पाकिस्तानची भूमिका आणि आर्थिक विकासासोबतच अन्य मुद्यांवर देखील भाष्य केले. 

1. दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे टीका करताना म्हणाले की, काही देश दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आपला देश ज्यांच्याकडून सांभाळला जात नाही, त्यांना त्रास होतो. द्वेष हेच त्यांचे शस्त्र बनले आहे. दहशतवाद्यांचे ते समर्थन करतात. दहशतवाद्यांना त्यांनी आश्रय दिला आहे. हीच त्यांची जगात ओळख आहे. अमेरिकेत झालेला ९/११ हल्ला किंवा भारतातील २६/११ हल्ला हे त्यांचे कट कारस्थान असते. आता दहशतवादाविरुद्ध व त्यांना पोसणाऱ्यांविरुद्ध पूर्ण शक्तिनिशी उभे राहण्याची वेळ आली आहे. ट्रम्प या लढाईत सर्व शक्तिनिशी उभे आहेत. त्यांना आपण उभे राहून शुभेच्छा द्याव्यात असं देखील त्यांनी स्पष्ट केले.

2. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रशंसा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रशंसा करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ट्रम्प यांचा कोणताही परिचय करून देण्याची गरज नाही. मी त्यांचे नेतृत्व, अमेरिकेबाबतची त्यांची प्रबळ इच्छा व अमेरिकेची वाटणारी त्यांना चिंता याबाबत मी त्यांची प्रशंसा करतो. मी जेव्हा त्यांना प्रथम भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले होते की, भारताचा सच्चा मित्र व्हाईट हाऊस आहे. तसेच अब की बार ट्रम्प सरकार असं म्हणत अमेरिकेतील आगामी निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला.

3. 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था

भारत व्यवसाय करण्यासाठीचे अधिक चांगले ठिकाण बनविण्यासाठी आपले सरकार प्रयत्नांत कोणतीही कसर ठेवत नसल्याचे मागील काही आठवड्यांतील आर्थिक घोषणांतून दिसून येते. समाजाच्या सर्व स्तरांतील घटकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि भारताला ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता समृद्धी वाढविण्यासाठीही सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या भारतीयांना केले.

4. भ्रष्टाचार मुक्त भारत

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आम्ही देशातील जवळपास साडेतीन लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत. तसेच देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने देशातील अनेक लोकांना विनामूल्य गॅस कनेक्शन दिले आहे. त्याचप्रमाणे करप्रणाली सुलभ करून सरकारने जनतेचे त्रास दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

5. 17व्या लोकसभा निवडणुकीत 61 कोटी लोकांनी केलं मतदान

मोदी आपल्या भाषणात म्हणाले की भारत हा जगातील एक मोठा लोकशाही देश आहे. देशातील 17 व्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 61 कोटी लोकांनी भाग घेतला. त्यांनी सांगितले की या निवडणुकीत 18 कोटी तरुणांनी प्रथमच मतदान केले. तसेच, यावेळी अधिक महिला निवडून आल्या. आज भारतातील सर्वात मोठे नारा म्हणजे सिद्धी विद संकल्प आणि संकल्प हे न्यू इंडिया असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

6. जम्मू- काश्मीरमधील कलम 370 हटविले

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एक भारतीय विकासापासून दूर राहावं हे भारताला मान्य नाही. भारताने ७० वर्षांच्या कलम ३७०ला हटवून तेथील स्थानिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कलम ३७० ने लोकांना विकास व समान अधिकारांपासून वंचित ठेवले होते. भारताच्या घटनेने जे अधिकार इतरांना दिले ते आता जम्मू-काश्मीरमधील महिला व नागरिकांना दिले आहेत. लोकसभा व राज्यसभेने याला मंजुरी देण्यासाठी तासनतास चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

7. करमुक्त भारत

सरकारने पहिल्यापासून देशात सुरु असलेल्या कर आकरणी पासून देशाला मुक्त केले आहे. तसेच येत्या 2 ऑक्टोबरला भारत गांधी जयंती निमित्त देशाला भ्रष्टचारापासून पूर्णपणे मुक्त करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

8. सरकारची 10,000 सेवा ऑनलाईन जगात सर्वांत स्वस्त इंटरनेट डाटा भारतात उपलब्ध आहे. 10,000 सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. एका आठवड्यात पासपोर्ट घरी येतो. व्हिसा मिळवण्यातील अडचणी मिटवण्यासाठी ई-व्हिसाची सोय केली आहे. नवीन संपत्तीची २४ तासांत नोंदणी होते. पाच दशलक्ष लोकांनी ऑनलाईन आयटीआर भरला.

9. व्यवसाय सोपा करण्याचा उद्देश

जगभारात भारत एक असा देश आहे की या देशामध्ये डेटा सर्वात कमी किंमतीत उपलब्ध आहे. यामुळे अनेक व्यवसायीकांना याचा फायदा होत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. 

10. विविधता हीच आमची एकता

देशातील विविधता हीच आमची एकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एनआरजी ऊर्जा ही भारत आणि अमेरीकेसोबतचे सहकार्याचे प्रतिक असून 130 कोटी भारतीयांचा हा सन्मान असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Howdy Modiहाऊडी मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदी