शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Howdy Modi : बेरोजगारी सोडून भारतात सारे काही आलबेल, पी. चिदंबरम यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 12:24 IST

आयएनएक्स मीडिया खटल्या प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या पी. चिदंबरम यांनी हाऊडी मोदी कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया खटल्या प्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या पी. चिदंबरम यांनी हाऊडी मोदी कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. भारतामध्ये सारे काही छान चालले आहे. आलबेल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्युस्टन येथील कार्यक्रमादरम्यान सांगितले होते. त्यावरून चिदंबरम यांनी मोदींवर टीका केली आहे. भारतात रोजगार सोडून सारे काही छान चालले आहे, असा टोला त्यांनी मोदींना लगावला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज पी. चिदंबरम यांची भेट घेतली. त्यानंतर पी. चिदंबरम यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली. ''रोजगारावर आलेले संकट, मॉब लिंचिंग, काश्मीरमधील परिस्थिती, विरोधी पक्षांच्या नेत्यांची तुरुंगात करण्यात आलेली रवानगी आणि कमी वेतनमान हे सारे सोडून भारतात सारे काही चांगले आहे, आलबेल आहे,'' असे ट्विट चिदंबरम यांनी केले आहे. 

   ह्युस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर भाषणात मोदींनी मराठी व इतर भारतीय भाषांमधून प्रेक्षकांना त्यांची खुशाली विचारली. तसेत भारतात सर्व छान चालले आहे, असे त्यांनी मराठीत सांगितले होते, त्यावरून चिदंबरम यांनी मोदींना टोला लगावला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ह्युस्टनमधल्या एनआरजी स्टेडियममध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.  त्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या 50 हजार भारतीयांना मोदी यांनी संबोधित केले. उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर भाषणाला मोदींनी हिंदीतून सुरूवात करतानाच तेथील जनसमुदाय, उत्साह, जल्लोष याचा उल्लेख केला. हे दृश्य, हा माहोल अकल्पनीय आहे. टेक्सासच्या इतिहासात हे अविश्वसनीय आहे. हा अपार जनसमूह उपस्थित आहे. ही संख्या गणितात मोजता येणारी नाही. नवा इतिहास घडतो आहे. ट्रम्प यांचे येणे हे अमेरिकेच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे, असे म्हटले होते. 

टॅग्स :Howdy Modiहाऊडी मोदीP. Chidambaramपी. चिदंबरमNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत