शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विषारी औषधांचा विळखा कसा सोडवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 12:18 IST

केवळ त्या प्रतिमेवरच पुढे भारतीय उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व टिकून राहील.

डॉ. सुरेश सरवडेकर, माजी सहायक संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

आतापर्यंत भारताची औषधनिर्मितीत केवळ ‘खिशाला परवडणारी औषधे’ पुरविणारा देश म्हणून प्रतिमा आहे. ती बदलून ‘गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा करणारा एकमेव देश’ अशी प्रतिमा होणे अपेक्षित आहे. केवळ त्या प्रतिमेवरच पुढे भारतीय उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर अस्तित्व टिकून राहील.

आजकाल ‘सत्य बातम्या’ पचवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अलीकडेच विषारी कफ सिरपमुळे २६ मुलांचा मृत्यू झाला. ‘स्रेसन फार्मास्युटिकल्स’ने बनवलेल्या कोल्ड्रिफ सिरपमध्ये ४८.६% डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) हे रसायन असल्याचे चाचणीत आढळले. इतक्या प्रमाणात सेवन केल्यावर ते विष होते. या सिरपमध्ये त्याचे प्रमाण कायदेशीर परवानगी असलेल्या कमाल मर्यादेपेक्षा जवळजवळ ५०० पट जास्त असल्याचे तपासणीत आढळून आले. तामिळनाडू येथील ‘स्रेसन’च्या कारखान्यात सुरक्षाविषयक गंभीर उल्लंघने उघडकीस आली. औषधनिर्मितीसाठी वापरण्यायोग्य नसलेली नॉन-फार्माग्रेड रसायने, गंजलेली उपकरणे तेथे आढळली. यावरून भारतातील औषधनिर्मिती कंपन्यांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

२०१९-२० मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये निकृष्ट दर्जाच्या कफ सिरपमुळे ११ मुलांचा मृत्यू झाला होता. हे सिरप हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरयाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मेघालय, त्रिपुरा येथेही विकले गेले होते. २०२२ मध्ये डीईजी दूषित भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्याने गांबियामध्ये ७० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला होता. तसेच उझबेकिस्तानमध्ये १८ मुले दगावली होती.

२०२४ मध्ये कर्नाटकातील बेल्लारी जिल्हा रुग्णालयात ३४ महिलांची सिझेरिअन प्रसूती झाली. त्यापैकी सात महिलांना मूत्रपिंड दुखापत, अवयव निकामी होणे अशा गुंतागुंत होऊन ५ महिलांचा मृत्यू झाला. हे मृत्यू निकृष्ट रिंगर्स लॅक्टेट ४ या द्रवपदार्थाच्या वापराशी संबंधित असल्याचा संशय आहे. 

या सर्व घटना मुख्यत्वे कुठे घडल्या? तर भारतामध्ये आणि औषधाबद्दल अजिबातच कायदा सुरक्षितता नसलेल्या किंवा कमी प्रमाणात असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये.  विकसित आणि विकसनशील देशांमध्ये त्या घडल्या नाहीत. कारण त्या देशांमध्ये औषधांच्या गुणवत्तेचे नियमन अतिशय कडक आहे. आपल्याकडे मात्र तसे नाही.

भारताचा औषध उद्योग; ना हमी, ना गुणवत्ता १०,५०० औषध उत्पादन युनिट्स भारतात आहेत. ३,००० कंपन्या औषधनिर्मिती करतात. त्यापैकी १,४०० युनिट्सना डब्ल्यूएचओ-जीएमपी मान्यताप्राप्त (विकसनशील  देशांमध्ये निर्यात करतात.) २६० यूएस-एफडीए मान्यताप्राप्त (विकसित देशांमध्ये निर्यात करतात.) २५३ युरोपियन डायरेक्टरेट ऑफ क्वालिटी मेडिसिन मान्यताप्राप्त. (युरोपियन देशांमध्ये निर्यात करतात.) उरलेले हजारो उत्पादक केवळ ‘घरगुती वापराचे’ औषध तयार करतात.

भारतीय औषध गुणवत्ता नियमनातील उणिवा

२००३ मध्ये शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर समितीने भारतातील औषध नियमन व्यवस्थेचा अभ्यास करून भारत सरकारला एक अहवाल सादर केला होता. त्यात त्यांनी काही त्रुटी ताबडतोब दूर करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.

भारतातील जवळपास अर्ध्या राज्य औषध चाचणी प्रयोगशाळांमध्ये योग्य उपकरणे किंवा पात्र विश्लेषकांचा अभाव आहे. अमेरिकेत ४८ राज्ये आणि प्यूर्टो रिकोमध्ये सुमारे २,५०० औषध उत्पादक आणि १,५८० बायोफार्मास्युटिकल उत्पादन सुविधा आहेत. यावर देखरेख करण्यासाठी, एफडीएतर्फे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शास्त्रज्ञ, निरीक्षक आणि प्रशासकांसह १८,००० हून अधिक लोक कार्यरत आहेत. 

त्या तुलनेत, भारतात ३,००० हून अधिक औषध कंपन्यांमध्ये सुमारे १०,५०० औषध उत्पादन युनिट्स आहेत. ही संख्या अमेरिकेपेक्षा सुमारे चार पट अधिक आहे. तरीही भारतातील नियामक कर्मचारीवर्ग अत्यंत कमी आहे.

भारतात औषध उत्पादनासाठी परवाने राज्य सरकारकडून दिले जातात, तर केंद्र सरकार मानके ठरवते आणि निर्यात हाताळते. यामुळे अंमलबजावणीत विसंगती निर्माण झाली आणि नियमन प्रणाली गुंतागुंतीची आणि अपारदर्शक झाली आहे.

गंभीर दुखापत किंवा मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या बनावट औषधांच्या विक्री आणि उत्पादनासाठी कडक दंडात्मक कारवाईची तरतूद आवश्यक आहे. सध्याच्या कायद्यात तशी कठोर तरतूद नाही. नकली औषधे बनविणाऱ्या उत्पादकांवर जरब बसेल यासाठी यात आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Unsafe Medicines: How to Escape the Deadly Drug Trap?

Web Summary : India's drug quality faces scrutiny after deaths linked to contaminated syrups and substandard medicines. Lax regulations, inadequate testing, and lenient penalties exacerbate the crisis. Stronger oversight and strict enforcement are crucial to ensure safe, quality drugs and protect public health.
टॅग्स :Medicalवैद्यकीयmedicineऔषधंmedicinesऔषधं