कसा होईल व्हॅक्सिनचा पुरवठा

By Admin | Updated: July 3, 2015 23:15 IST2015-07-03T23:15:50+5:302015-07-03T23:15:50+5:30

How will the vaccine supply | कसा होईल व्हॅक्सिनचा पुरवठा

कसा होईल व्हॅक्सिनचा पुरवठा

> जिल्हा परिषद : व्हॅक्सिन व्हॅनला परवाना नाही
नागपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून राष्ट्रीय ग्र्रामीण आरोग्य अभियानांतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जिल्हा आरोग्य विभागाला व्हॅक्सिन व्हॅन प्राप्त झाली आहे. परंतु परिवहन विभागाचा परवाना नसल्याने ही व्हॅन गेल्या दीड महिन्यापासून जिल्हा परिषद कार्यालयापुढे वापराविना उभी आहे. त्यामुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनचा पुरवठा कसा होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जि.प.च्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३१६ उपकेंद्रांना शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या व्हॅक्सिनचा पुरवठा केला जातो. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्या पुरविल्या जात होत्या. या कामासाठी रुणवाहिका वापरल्या जात नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याची ग्रामीण भगातील लोकांची ओरड होती. रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध व्हावी या हेतूने सर्व जिल्ह्यांना व्हॅक्सिन व्हॅन उपलब्ध करण्यात आल्या आहे. परंतु दीड महिन्यापासून ही व्हॅन वापराविना उभी आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडे चौकशी केली असता परिवहन विभागाकडून अद्याप परवाना मिळाला नसल्याने व्हॅन उभी असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: How will the vaccine supply