शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेले घड्याळ कर्नाटकात कसे चालणार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची राष्ट्रवादीवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 12:42 IST

राष्ट्रवादीवादीने अगोदर घर सांभाळावे

दत्ता पाटीलम्हाकवे: बंद पडलेले घड्याळ आता कर्नाटकातील निवडणूक रिंगणात उतरले आहे. प्रचारासाठी आज जयंत पाटील आले होते. तर शरद पवार ही येणार असल्याचे समजते. निपाणीच्या माहेरवाशीण असणाऱ्या शशिकला जोल्ले या निपाणी मतदार संघ सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. तुम्हाला सोडून लोक चालले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीवादीने अगोदर घर सांभाळावे असा कानमंत्र देत केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढविला.निपाणी येथे निपाणी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी उपस्थित होत्या.निपाणी मतदार संघातील मतदारांना शशिकला जोल्ले यांना निवडून देवून हॅट्रिक साधायची असताना बंद पडलेले घड्याळ आणि कर्नाटकात पिछेहाट झालेली काँग्रेस पक्ष खोडा घालत आहे. परंतु, एक नारी सभपे भारी है असल्याचे त्या म्हणाल्या.मोदींचे हात बळकट करा... कोरोना काळात जीव धोक्यात घालून आमदार शशिकला जोल्ले या लोकांना धीर देत होत्या. यावेळी येथील अनेक नेते मंडळी घरात होते. तर या काळात पंतप्रधान मोदींनी गरिबांना मोफत धान्य, औषध पुरवठा केला. तसेच, प्रत्येकाला कोरोना लसीचे दोन डोस दिले. त्यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी मतदान पेटीतून विरोधकांना इंजेक्शन द्या. निपाणीच्या माहेरवाशीण असणाऱ्या शशिकला जोल्ले या घरच्या मुलीचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना हद्दपार करा असे आवाहनही मंत्री इराणी यांनी केले.३ हजार युवकांना रोजगार देणार : जोल्ले बिरेश्वर बँकच्या १०० नव्या शाखांना मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून दीड हजार तर हालसिध्दनाथ साखर कारखान्यांमध्ये बाराशेहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. या नोकऱ्या निपाणी परिसरातील बेरोजगार तरुणांना देणार असल्याचे शशिकला जोल्ले यांनी सांगितले.स्वागत विभावरी खांडके यांनी केले. सुञसंचालन सोनल कोटडीया यांनी केले. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, हालशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, नगराध्यक्ष जयवंत भाटले, प्रणव माने, निता बागडे, राजु बुंदेशा, अजित गोपचाळ, वृषभ जैन, पवन पाटील यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकSmriti Iraniस्मृती इराणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार