शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांना मध्यपूर्वेतून कसं काढणार? दूतावास सज्य म्हणत जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितला भारताचा 'संपूर्ण प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:41 IST

"पंतप्रधान स्वतः मध्यपूर्वेतील या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कॅबिनेट समितीच्या (CCS) बैठकीतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे."

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे पश्चिम आशियातील तणाव प्रचंड वाढला आहे. या वाढत्या संघर्षावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत चिंता व्यक्त केली. या वादावर भाष्य करताना ते म्हणाले, सर्व मुद्यांवर चर्चेच्या माध्यमाने तोडगा निघावा, असे भारताचे ठाम मत आहे. तसेच, मध्य पूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना आर्मेनियामार्गे सुखरूप भारतात आणले जात आहे, अशी माहितीही परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.

भारताने इराणी जहाजाला दिला आश्रय - पुढे बोलताना जयशंकर म्हणाले, "मी २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांच्या विनंतीनुसार, हिंदी महासागरात असलेल्या इराणच्या तीन जहाजांपैकी एकाला भारताने आश्रय दिला आहे, ज्याबद्दल इराणने भारताचे आभारही मानले आहेत." भारत शांततेच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या बाजूने असून ऊर्जा गरजांबाबत पूर्णपणे सतर्क आहे.

तेहरानमधील दूतावास हाय-अलर्टवर -मध्यपूर्वेतील तणावाच्या परिस्थितीत भारताच्या तेहरानमधील दुतावासासंदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले, तेहरानमधील भारतीय दूतावास पूर्णपणे कार्यरत आणि हाय-अलर्टवर आहे. दूतावासाने अनेक भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास मदत केली असून, व्यवसायानिमित्त इराणमध्ये गेलेल्या भारतीयांना आर्मेनियामार्गे परत आणले जात आहे.

पंतप्रधान स्वतः मध्यपूर्वेतील या घडामोडींवर लक्ष ठेवून  -याशिवाय, "पंतप्रधान स्वतः मध्यपूर्वेतील या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कॅबिनेट समितीच्या (CCS) बैठकीतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आम्ही जानेवारीतच नागरिकांना सतर्क केले होते. भारत या क्षेत्रातील स्थिरतेसाठी आणि शांततेसाठी कटिबद्ध आहे," असेही जयशंकर यांनी यावेळी संपष्ट कले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : India's Middle East Evacuation Plan: Embassy Ready, Jaishankar Addresses Parliament

Web Summary : Amidst rising tensions, India prioritizes citizen safety in the Middle East. Evacuations via Armenia are underway. The Tehran embassy is on high alert. India supports dialogue and regional stability.
टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरRajya Sabhaराज्यसभाIranइराणNarendra Modiनरेंद्र मोदी