शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बेघर लोकांचे आधार कसे बनणार? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 12:26 IST

बेघर नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. कायमस्वरूपी पत्त्याशिवाय राहत असलेल्या बेघर व्यक्तींना आधार कार्ड कसे काय मिळेल, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केली.

नवी दिल्ली -  बेघर नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. कायमस्वरूपी पत्त्याशिवाय राहत असलेल्या बेघर व्यक्तींना आधार कार्ड कसे काय मिळेल, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सरकारला केली. न्यायमूर्ती मदन बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने देशभरातील शहरी बेघर नागरिकांना राहण्याची सोय उपलब्ध करून देण्याविषयी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना ही टिप्पणी केली. त्याबरोबरच शहरी बेघर लोकांचे आधार कार्ड कसे बनवण्यात येत आहेत, अशी विचारणाही न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारकडे केली. 

जर कुणी बेघर नागरिक असेल तर आधार कार्डमध्ये त्याला कसे काय सामावून घेतले जाईल, अशी विचारणा उत्तर प्रदेशकडून हजर झालेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे खंडपीठाने केली. त्यावर मेहता यांनी उत्तर दिले की त्याच्याकडे आधार कार्ड नसण्याची शक्यता अधिक असेल. त्यावर प्रतिप्रश्न करताना आधार कार्ड नसलेली बेघर व्यक्ती भारत सरकार आणि आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दृष्टीने अस्तित्वात नाहीत का आणि त्यांना रात्र निवाऱ्यांमध्ये जागा मिळणार नाही का?  त्यावर मेहता म्हणाले की, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे, त्यांच्याकडे मतदार ओळखपत्रासारखे अन्य पुरावे असतात. त्यावर त्यांचा पत्ताही दिलेला असतो. आम्ही एका मानवी समस्येशी झुंजत आहोत. आधार कार्डसाठी स्थायी पत्ता दिला जाऊ शकतो. शहरी बेघर नागरिक हे ये जा करणाऱ्या जनतेमध्ये मोडतात. 

   या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची एक समिती बनवण्याचाही निर्णय घेतला, जी बेघऱ लोकांसाठीच्या शेल्टर होमची देखरेख करेल.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकार