वैनगंगेचे प्रदूषण कसे थांबवाल

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:36+5:302015-01-22T00:07:36+5:30

नागपूर : नागपूर व इतर शहरांतील सांडपाणी मिसळत असल्यामुळे वैनगंगा नदी व गोसेखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. यासंदर्भात शासन व नागपूर महानगरपालिका काय उपाययोजना करणार आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.

How to Stop Wainganga Pollution | वैनगंगेचे प्रदूषण कसे थांबवाल

वैनगंगेचे प्रदूषण कसे थांबवाल

गपूर : नागपूर व इतर शहरांतील सांडपाणी मिसळत असल्यामुळे वैनगंगा नदी व गोसेखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. यासंदर्भात शासन व नागपूर महानगरपालिका काय उपाययोजना करणार आहेत, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.
याप्रकरणी तीन जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. गोसेखुर्द धरणाची दारे उघडून पाणी वाहून जाऊ द्यावे. यामुळे पाण्याची पातळी कमी होऊन बुडीत क्षेत्रातील नागरिकांचे नुकसान होणार नाही. धरणातील पाणी प्रचंड प्रदूषित झाल्याने ते पिण्यासाठी किंवा सिंचनासाठी वापरू शकत नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रतिज्ञापत्र सादर करून धरणाचे पाणी प्रदूषित असल्याचे मान्य केले आहे. पाणी नागरिकांसाठी धोकादायक आहे काय हे ठरविण्यासाठी किमान पाच चाचण्या करणे आवश्यक असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.

Web Title: How to Stop Wainganga Pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.