शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

गुन्हेगारीचा टिळा घेऊन किती जाणार लोकसभेत?

By admin | Updated: May 12, 2014 04:42 IST

एकीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार नको, असे दावे सगळ्याच पक्षांकडून करण्यात येतात. परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी काही झाल्याचे दिसून आले नाही.

१३९८ रिंगणात : २२०८ उमेदवार कोट्यधीश

नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुका निरनिराळ्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरल्या आहेत. ज्याप्रमाणे मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसून आली, अगदी त्याचप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराच्या संख्येतदेखील वाढ झाली. देशभरात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या १३९८ उमेदवारांनी निवडणूक लढवली. यातील किती उमेदवार लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसद भवनात दाखल होतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकांत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किंवा गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीट दिले. याशिवाय २२०८ कोट्यधीश उमेदवारदेखील रिंगणात होते. ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ आणि ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने निवडणूक लढणार्‍या एकूण ८२३० पैकी ८१६३ उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केला. गेल्या लोकसभा निवडणुकांत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ११५८ उमेदवार रिंगणात होते. यंदा त्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मोठे पक्ष आघाडीवर

एकीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार नको, असे दावे सगळ्याच पक्षांकडून करण्यात येतात. परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी काही झाल्याचे दिसून आले नाही. काँग्रेसच्या ४६२ पैकी १२८, तर भाजपाच्या ४२६ पैकी १४० उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. ‘आप’च्या ४२७ पैकी ६५ तर बसपाच्या ५०१ पैकी ११४ उमेदवारांवर प्रकरणे दाखल आहेत. ३१८२ अपक्ष उमेदवारांपैकी ३०७ जणांनी शपथपत्रात गुन्हे दाखल असल्याचे मान्य केले आहे. ६०८ उमेदवारांवर हत्येचा प्रयत्न, अपहरण यासारखे गुन्हे दाखल आहेत, तर ५७ उमेदवारांवर हत्या केल्याचा आरोप आहे.