शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत दौऱ्यावर किती खर्च झाला..? RTIद्वारे समरो आली मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 2:42 PM

2020 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या भारत दौऱ्यात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवी दिल्ली: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2020 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. डोनाल्ड यांच्यासाठी 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या स्वागतासाठी भारत सरकारने गुजरातमध्ये भव्य-दिव्य तयारी करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या त्या 36 तासांच्या दौऱ्यावर केंद्र सरकारने किती खर्च केला, याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने ट्रम्प यांच्या दौऱ्यावर सुमारे 38 लाख रुपये खर्च केले आहेत.

अहमदाबाद, आग्रा, नवी दिल्लीला भेट दिलीएका आरटीआयद्वारे परराष्ट्र मंत्रालयाकडून ट्रम्प यांच्यासाठी आयोजित कार्यक्रमाबाबत माहिती मागवण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर ट्रम्प यांनी पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड कुशनर आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 24,25 फेब्रुवारीला अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट दिली होती.

ट्रम्प यांनी 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये तीन तास घालवले होते. यादरम्यान त्यांनी 22 किमी लांबीच्या रोड शोमध्ये भाग घेतला. यानंतर, साबरमती आश्रमात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि नव्याने बांधलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत "नमस्ते ट्रम्प" सभेला संबोधित केले. यानंतर ट्रम्प त्याच दिवशी ताजमहाल पाहायला गेले. 25 फेब्रुवारी रोजी त्यांनी नवी दिल्लीला भेट दिली, तिथे त्यांची मोदींशी द्विपक्षीय चर्चा झाली.

24 ऑक्टोबर 2020 रोजी आरटीआय मिळालेल्या माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्त्याने 24 ऑक्टोबर 2020 रोजी आरटीआय दाखल केला होता, परंतु त्याला सरकारकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर अर्जदाराने पहिले अपील दाखल केली आणि नंतर आरटीआय प्रकरणांमध्ये सर्वोच्च अपीलीय प्राधिकरण असलेल्या आयोगाशी संपर्क साधला. कोविडच्या प्रादुर्भावामुळे आरटीआयला उत्तर देण्यास विलंब झाल्याचे परराष्ट्र मंत्री म्हणाले होते. यानंतर, या वर्षी 4 ऑगस्ट रोजी परराष्ट्र मंत्रालयाने आयोगाला आरटीआयची माहिती दिली. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता