शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

किती पैसे येतात शेतकऱ्याच्या खिशात? देशात शेतमालाचे उत्पादन तर वाढले, पिकविणारे हात मात्र रिकामेच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 09:20 IST

राजेंद्र जाधव, कृषी विषयाचे अभ्यासक - गहू, तांदूळ, ज्वारी यांसारख्या तृणधान्यांचे आपल्या आहारातील प्रमाण हळूहळू कमी होत आहे. त्याची जागा ...

राजेंद्र जाधव, कृषी विषयाचे अभ्यासक -गहू, तांदूळ, ज्वारी यांसारख्या तृणधान्यांचे आपल्या आहारातील प्रमाण हळूहळू कमी होत आहे. त्याची जागा फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ घेत आहेत. वाढते शहरीकरण, संपन्नता आणि आरोग्याबाबतची काळजी घेण्यामुळे हे होत आहे. कोरोनामुळे या बदलाला आणखीनच वेग मिळाला आहे. या वस्तूंची मागणी वाढत असल्याने साहजिकच शेतकऱ्यांनीही त्यांचे उत्पादन दोन दशकांत वेगाने वाढवले. जगात आपण बहुतांश शेतमालाच्या उत्पादनात पहिल्या अथवा दुसऱ्या स्थानावर पोहोचलो. मात्र यामध्येच शेतकऱ्यांची सर्वाधिक पिळवणूक होत असल्याची बाब रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आली आहे.

या अहवालानुसार कांदा, टोमॅटो आणि बटाटा विकत घेताना ग्राहकाने मोजलेल्या किमतीतील केवळ एक तृतीयांश भाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. उरलेला दोन तृतीयांश भाग किरकोळ, ठोक व्यापारी आणि दलाल लाटत असतात. फळांच्या बाबतीत हीच अवस्था आहे. ग्राहकाने केळीसाठी शंभर रुपये मोजले तर केवळ ३१ रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. द्राक्षाच्या बाबतीत केवळ ३५ रुपये तर आंब्याच्या बाबतीत ४३ रुपये. या तुलनेत दूध, अंडी आणि कडधान्ये उत्पादकांची स्थिती जास्त चांगली आहे; कारण त्यांना ग्राहकाने मोजलेल्या किमतीतील जवळपास दोन तृतीयांश मोबदला मिळतो.

खाद्यान्न महागाईचे दुष्टचक्र माेडणे कठीणnनाशवंत शेतमालाच्या साठवणूक आणि वाहतुकीसाठी काही वर्षांच्या अंतराने वेगवेगळ्या घोषणा होतच असतात. मात्र तरीही फळे आणि भाजीपाला यांची पुरवठा साखळी अजूनही नीट बसवता आलेली नाही. फारच कमी शेतमालावर प्रक्रिया होते.nयाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. तोटा झाल्यानंतर शेतकरी काही काळासाठी दुसऱ्या पिकांकडे वळतात आणि पुरवठा आणखी कमी होतो. ज्यामुळे फळे आणि पालेभाज्या, भाज्यांच्या किमती आणखी वाढतात. भाज्यांची आयात शक्य नाही.nत्यामुळे देशांतर्गत पुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत दर चढे राहतात. सरकारला वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नसतो. याचा मोठा तोटा ग्राहकांना होतो. त्यासोबतच महागाई निर्देशांकामध्ये मोठी वाढ होऊन पतधोरण ठरविणे रिझर्व्ह बँकेस अवघड जाते; कारण अन्नधान्याच्या किरकोळ महागाई निर्देशांकात जवळपास ४६ टक्के वाटा आहे.

महागाईचा आर्थिक विकासावरही हाेताे परिणाममहागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयला व्याजदर वाढवावे लागतात. ज्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर सर्व प्रकारच्या कर्जांसाठीचे व्याजदर वाढतात. परिणामी ग्राहकांची क्रयशक्ती कमी होऊन औद्योगिक उत्पादनांचीही मागणी कमी होते. याचा गुंतवणुकीवर वाईट परिणाम होतो. खासगी उद्योग महागड्या पतपुरवठ्यामुळे गुंतवणूक करण्यास राजी होत नाहीत. देशाचा आर्थिक विकास दर ज्यामुळे मंदावतो. एका बाजूला वाढती महागाई आणि दुसऱ्या बाजूला मंदावलेला आर्थिक विकास दर यांचा फटका गरीब-श्रीमंत, शहरी-ग्रामीण प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात बसतो.

प्रस्थापित व्यवस्थेत  बदल करण्याची गरजदेशी-परदेशी कंपन्यांनी ऑनलाइन विक्री व्यवस्था आणल्यानंतर त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांकडून ग्राहकाला थेट शेतमाल विकत घेता येईल आणि दलालांची मधली साखळी संपेल, अशी आशा होती. मात्र अजूनही नाशवंत शेतमालासाठी पारंपरिक विक्री व्यवस्थेचाच शेतकऱ्यांना आधार घ्यावा लागतो. 

अनेक शेतमालाचे केवळ काही महिन्यांत उत्पादन होते; तर मागणी वर्षभर असते. शीतगृहांमार्फत साठवणुकीच्या सुविधा विविध राज्यांत उभ्या करण्याची गरज आहे. प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देऊन ज्यावेळी पुरवठा वाढेल त्यावेळी शेतमालावर प्रक्रिया होईल याची तजवीज’करावी लागेल.प्रस्थापित व्यवस्थेत तातडीने बदल केल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही. ते वाढले तरच नाशंवत शेतमालाच्या पुरवठ्यातील चढ-उतार कमी होतील व महागाईचा अचानक भडका होणार नाही.केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे तर शहरी मध्यमवर्गीय ग्राहक आणि अर्थव्यवस्था सुदृढ राहावी यासाठी ग्राहकांनी खर्च केलेल्या रुपयातील मोठा वाटा शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी