अवैध प्रवासी वाहतुकीने एसटीचे नुकसान किती
By Admin | Updated: September 6, 2015 23:54 IST2015-09-06T23:54:54+5:302015-09-06T23:54:54+5:30
न्यायालयाची विचारणा : सवलतीच्या योजना बंद करण्याचा इशारा

अवैध प्रवासी वाहतुकीने एसटीचे नुकसान किती
न यायालयाची विचारणा : सवलतीच्या योजना बंद करण्याचा इशाराविलास गावंडेयवतमाळ : अवैध प्रवासी वाहतुकीमुळे किती आर्थिक नुकसान होते आणि ही वाहतूक बंद केल्यास किती फायदा होईल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाला केली आहे. एसटी तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महामंडळाकडून नानाविध प्रयत्न होत आहेत. यानंतरही उत्पन्न वाढत नाही. परिणामी विविध कारणे पुढे केली जात आहेत. यात शासनाकडे असलेली कोट्यवधी रुपये थकीत रक्कम आणि अवैध प्रवासी वाहतूक ही प्रमुख कारणे सांगितली जातात. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.यावर न्यायालयाने या वाहतुकीमुळे महामंडळाचे किती आर्थिक नुकसान होते, याचा हिशेब मागितला. ही माहिती गोळा करण्याचे आदेश महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (वाहतूक) सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना दिले आहेत.