शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यानं भारताचं किती होतं नुकसान? 'इतका' मोठा बसतो फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 12:35 IST

बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतासाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली -  जम्मू काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्ताननेभारतासाठी स्वतःची हवाई हद्द बंद केली आहे. पाकिस्ताननं ही हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भारतासाठी बंद केली आहे. परंतु पाकिस्तान ही हवाई हद्द भारतासाठी कायमस्वरूपी बंद करण्याच्या विचारात आहे. 

बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने हवाई हद्द बंद केली होती त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच हवाई हद्द खुली करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. बालकोट एअरस्ट्राईकनंतर तब्बल 138 दिवस पाकिस्तानची एअरस्पेस बंद असल्याने भारताला कोट्यावधीचे नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा घेतलेल्या हवाई हद्द बंद करण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. 

मागील वेळी किती झालं होतं नुकसान?138 दिवस पाकिस्तानने एअरस्पेस बंद ठेवल्याने पाकिस्तानला 5 कोटी डॉलर(360 कोटी) रुपयांचे नुकसान झाले होते. हे नुकसान ओवरफ्लाइंग चार्जच्या स्वरूपात झाले होते. फक्त एकट्या एअर इंडियाला 560 कोटी रूपये जास्त खर्च करावे लागले होते. त्याशिवाय इंडिगो, स्पाइसजेट, गोएअर यांना 60 कोटींचे नुकसान सहन करावं लागलं होतं. 

दिवसाला 400 उड्डाणांवर होणार परिणामबालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतासाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रतिदिन 400 विमान उड्डाणांवर त्याचा परिणाम झाला होता. बहुतांश विमानांनी ओमन मार्गे उड्डाण घेतलं होतं. तर इराणमार्गे 100 पेक्षा अधिक विमान वाहतूक सुरू होती. ओमन मार्गे उड्डाण घेणाऱ्या भारतीय विमानांना लंडन ते सिंगापूरदरम्यान 451 किमी अंतर वाढलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानने एअरस्पेस बंद केल्याने हीच परिस्थिती समोर येणार आहे. 

पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्याने भारतातून दक्षिण आशिया आणि यूरोपच्या विविध भागात जाण्या-येण्यासाठी लांबचा पल्ला घ्यावा लागतो. या विमानांना पाकिस्तानऐवजी मुंबई-अरबी समुद्र-मस्कट खाडीमार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे पूर्व पट्ट्यातून विमान उड्डाण घेणाऱ्यांना अमेरिकेला जाण्यासाठीचा वेळ वाढला जातो आणि इंधन भरण्यासाठीही पूर्वीपेक्षा अधिक ठिकाणी स्टॉप घ्यावा लागतो. त्यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढतो. 

पाकिस्तानच्या या निर्णयाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज एअर इंडियाच्या पायलटने सांगितले की, आम्ही 5 ऑगस्टला ज्या दिवशी कलम 370 रद्द केला तेव्हापासून आम्ही तयार आहोत. आम्ही मागीलवेळी केलेली रणनीती वापरणार आहे. यासाठी आम्हाला अतिरिक्त खर्च उचलावा लागणार आहे. मात्र तेल कंपन्यांना त्यांची थकबाकी न मिळाल्याने मागील आठवड्यापासून 6 विमानतळांवर एअर इंडियाला इंधन देणं बंद केलं आहे. इतरही अनेक विमान कंपन्यांनी अतिरिक्त खर्च उचलण्यासाठी तयारी आधीच करून ठेवली होती. 

  

टॅग्स :IndiaभारतIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानAir Indiaएअर इंडिया