शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

नितीश कुमार यांनी आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:15 IST

Nitish Kumar : बिहारच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा उलटफेर होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार महागठबंधन आघाडीतून एनडीए गटात जाण्याची चर्चा जोर धरत आहे. राजकीय भूमिका बदलण्याची नितीश कुमार यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा राजकीय अदलाबदलीचा खेळ केला आहे.

पाटणा - बिहारच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा उलटफेर होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार महागठबंधन आघाडीतून एनडीए गटात जाण्याची चर्चा जोर धरत आहे. राजकीय भूमिका बदलण्याची नितीश कुमार यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा राजकीय अदलाबदलीचा खेळ केला आहे.

१९९४ - समता पार्टीची स्थापनाजनता दलात सक्रिय असलेल्या नितीश कुमार यांनी १९९४ मध्ये समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस, ललन सिंह यांच्यासह समता पार्टी स्थापन केली. १९९५ च्या निवडणुकीवेळी त्यांनी डाव्यांशी युती केली, मात्र पराभूत झाले.१९९६ : एनडीएत प्रवेशपराभवानंतर डाव्यांशी फारकत घेत १९९६ मध्ये एनडीएत आले. २०१३ पर्यंत १७ वर्षे ते भाजपसोबत होते. २०१३ : एनडीएतून बाहेर२०१४ च्या लोकसभेसाठी भाजपने पंतप्रधानपदासाठी मोदी यांना पुढे केल्याने नितीश कुमार यांचा भ्रमनिरास झाला. ते स्वबळावर लढले. परंतु जदयूला २ जागा जिंकता आल्या.२०१५ - काँग्रेस-राजदशी युती२०१५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी नितीश कुमार यांनी काँग्रेस-राजदशी युती केली. भाजपचा पराभव करत त्यांनी सरकार स्थापन केले.२०१७ : भाजपशी पुन्हा युतीतेजस्वी यादव यांचे आयआरसीटीसी घोटाळ्यात नाव आल्याने कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. २०२० च्या निवडणुकीत जेडीयूला ४३ जागा, तर भाजपला ७४ जागा मिळाल्या. २०२२ : पुन्हा महागठबंधनकडे भाजपसोबतची युती तोडत नितीश कुमार पुन्हा एकदा महागठबंधनकडे आले. राजद, काँग्रेससोबत त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वतःकडे ठेवली. आता त्यांनी भाजपशी हातमिळवणीची तयारी केली आहे.यंदा भूमिका का बदलली? - ‘इंडिया’चे संयोजकपद न मिळणे - जागावाटपाबाबत होणारा विलंब - इंडिया’त राजकीय भवितव्य नाही- भाजपच्या दिशेने असलेले राजकीय वारे - प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार