शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

देशात राजकीय पक्ष आहेत तरी किती? १९५१ साली ५३ पक्ष रिंगणात, आता किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 12:48 IST

काँग्रेसने जिंकल्यात सर्वाधिक लोकसभा निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशात १९५१ साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत ५३ राजकीय पक्ष रिंगणात उतरले होते. आता राजकीय पक्षांची संख्या २५०० वर पोहोचली आहे. मात्र, गेल्या सात दशकांत राष्ट्रीय पक्षांचा आकडा १४ वरून ६ पर्यंत खाली घसरला आहे. भारतातील निवडणुकांच्या इतिहासाचा आढावा घेणारे ‘लिप ऑफ फेथ’ हे पुस्तक निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केले आहे. त्यात बरीच रंजक माहिती देण्यात आली आहे.

१९९६मध्ये २०९ पक्ष; २,५०० एकूण पक्ष देशभरात; कधी किती पक्ष?

वर्ष    एकूण पक्ष    राष्ट्रीय पक्ष

  • १९९२    उपलब्ध नाही    ०७

(भाजप, काँग्रेस, भाकप, माकप, जनता दल, जनता पार्टी, लोक दल)

  • १९९६    २०९    ०८

(काँग्रेस, ऑल इंडिया काँग्रेस (तिवारी), भाजप, माकप, भाकप, जनता दल, जनता पार्टी, समता पार्टी)

  • २०१४    ४६४    ६

(भाजप, काँग्रेस, भाकप, माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, बसप)

  • २०१९    ६७४    ०७

(भाजप, काँग्रेस, बसप, भाकप, माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस)

राष्ट्रीय पक्ष

  • १९५२- १४
  • १९९२- ०७
  • १९९६- ०८
  • २००२४- ०६

यांचा राष्ट्रीय दर्जा गेला...

- आता तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. - ‘आप’ला राष्ट्रीय पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.- १९५३ नंतर अखिल भारतीय हिंदू महासभा, ऑल इंडिया भारतीय जनसंघ, रेव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सिस्ट गट) (एफबीएल-एमजी), ऑल इंडिया फाॅरवर्ड रेव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (आरसीपीआय) या पक्षांनी आपला राष्ट्रीय दर्जा गमावला.

काँग्रेसने जिंकल्या सर्वाधिक लोकसभा निवडणुका

१९६२ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत २७ पक्षांनी लढत दिली होती. त्यामध्ये ६ राष्ट्रीय पक्षांचा सहभाग होता. सोशालिस्ट (एसओसी), स्वतंत्र (एसडब्ल्यूए) या पक्षांनाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. १९५१ पासून झालेल्या १४ लोकसभा निवडणुकांपैकी ११ निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट होती.

 

टॅग्स :Politicsराजकारणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४