शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीतून नागरिकतेच्या आधारावर किती जणांची नावं वगळली? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 09:16 IST

"आम्हाला नावे वगळण्याच्या प्रक्रियेची वास्तविकता जाणून घ्यायची आहे. संशयास्पद नागरिकत्वाच्या आधारावर नावे काढून टाकण्यासाठी काही श्रेणी आहे का?"

विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेत "संशयास्पद नागरिकत्वाच्या" आधारावर किती मतदारांची नावे वगळली गेली? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक आयोगाला विचारला असून यासंदर्भात माहिती देण्यास सांगितले. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने मतदार वगळण्याच्या मृत्यू, डुप्लिकेशन आणि स्थलांतर अशा केवळ तीन श्रेणी सांगितल्या आहेत. खंडपीठाने आयोगाचे वरिष्ठ वकील राकेश द्विवेदी यांना विचारले की, "आम्हाला नावे वगळण्याच्या प्रक्रियेची वास्तविकता जाणून घ्यायची आहे. संशयास्पद नागरिकत्वाच्या आधारावर नावे काढून टाकण्यासाठी काही श्रेणी आहे का?"

निवडणूक आयोगाचा अधिकाऱ्यांना सवाल - निवडणूक आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील द्विवेदी यांनी खंडपीठाला सांगितले की, आपण माहिती घेऊन यासंदर्भात न्यायालयाने माहिती देऊ. ते म्हणाले, निवडणूक आयोग केवळ मतदार नोंदणीच्या मर्यादेपर्यंत नागरिकत्व निश्चित करू शकतो. कुणाला देशाबाहेर पाठवू शकत नाही अथवा कुणाला भारतात राहण्यासाठी व्हिसा आहे की, नाही हेही ठरवू शकत नाही.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या याचिकाकर्त्या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधित्व करणारे वकील प्रशांत भूषण म्हणाले, मतदान करण्यासाठी नागरिकत्व आवश्यक आहे, यात शंकाच नाही. मात्र, निवडणूक आयोगाला नागरिकत्व निश्चित करण्याचा अधिकार आहे का? हा मुख्य प्रश्न आहे.

मतदार यादीतून वगळलेली नावे सार्वजनिक करावीत -केरळमधील स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजननंतर प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार यादीतून काढून टाकलेल्यांची नावे देखील सार्वजनिक करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक आयोगाला दिले, जेणेकरून प्रभावित मतदार आक्षेप घेऊ शकतील. तसेच, या नावांविरुद्ध आक्षेप दाखल करण्याची अंतिम मुदत दोन आठवड्यांनी वाढविण्याचाही विचार करावा, असेही मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने म्हटले आहे की, अंतिम मुदत वाढवण्याच्या मुद्द्यावर विचार केला जाईल. केरळमध्ये आयोजित विशेष सघन विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या बॅचवर खंडपीठाने सुनावणी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Questions EC on Voter Roll Deletions Based on Citizenship

Web Summary : The Supreme Court asked the Election Commission about voters removed due to "suspected citizenship" during special revisions. The court seeks clarity beyond death, duplication, and migration reasons. Concerns were raised about the EC's authority to determine citizenship for voter eligibility. A directive was issued to publicize names removed from Kerala's voter list.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग