S Jaishankar on America : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन प्रशासनाने अवैध भारतीय स्थलांतरितांना भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 104 अवैध भारतीयांची पहिली तुकडी काल(5 फेब्रुवारी) लष्करी विमानाने भारतात पोहोचली. दरम्यान, यावर आता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत महत्वाची माहिती दिली आहे. हद्दपारीची प्रक्रिया नवीन नाही, हे वर्षानुवर्षे सुरू आहे, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना एस जयशंकर म्हणाले की, 104 भारतीयांना परत पाठवणार असल्याची माहिती आमच्याकडे आधीपासून होती. हद्दपारीची प्रक्रिया बघितली तर मग लष्करी विमान असो किंवा चार्टर्ड विमान असो, प्रक्रिया सारखीच असते. हद्दपारीची प्रक्रिया काही नवीन नाही. अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) विभागांतर्गत हद्दपारीची प्रक्रिया केली जाते. अमेरिकेने नियमानुसार, भारतीयांना परत पाठवण्यात आले आहे. हे नियम 2012 पासून लागू आहेत. प्रत्येक देशात लोकांचे नागरिकत्व तपासले जाते.
यापूर्वीही अशीच कारवाई केलीअमेरिका अवैध स्थलांतरितांवर आधीपासून अशीच कारवाई करते. यापूर्वीही अमेरिकेतून अशाच प्रकारे लोकांना परत पाठवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कराराचा संदर्भ देत जयशंकर म्हणाले की, कायदेशीर स्थलांतराला समर्थन देणे आणि अवैध स्थलांतरावर कारवाई करणे गरजेचे आहे. हे सर्वजण तिथे अतिशय वाईट परिस्थितीत अडकले होते. भारतीयांना कोणत्याही प्रकारची अमानवी वागणूक मिळू नये, यासाठी आम्ही अमेरिकन सरकारच्या सतत संपर्कात आहोत.
बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यावर भरजयशंकर पुढे म्हणाले की, परदेशात अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांना परत घेण्याची जबाबदारी सर्व देशांची आहे. अमेरिकन एजन्सी ICE (इमिग्रेशन आणि कस्टम्स एनफोर्समेंट) ने भारताला सांगितले की, निर्वासन दरम्यान महिला आणि मुलांना प्रतिबंधात ठेवले जात नाही. 2012 पासून लागू केलेल्या मानक कार्यप्रणाली (SOP) अंतर्गत, निर्वासित केलेल्या लोकांना उड्डाणात प्रतिबंधित केले जाते. निर्वासन दरम्यान, प्रवासी शौचालयात जातात तेव्हा निर्बंध हटवले जातात. भारत सरकार अमेरिकेच्या सरकारशी सतत चर्चा करत आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
आतापर्यंत किती भारतीय परत आले?यावेळी जयशंकर यांनी एक आकडेवारी सादर केली, ज्यात अमेरिकेने यापूर्वी भारतात पाठवलेल्या स्थलांतरितांची माहिती आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी 2009 पासून आतापर्यंतची आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की, 2009 मध्ये 734 भारतीयांना अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आले. 2010 मध्ये 799, 2011 मध्ये 597, 2012 मध्ये 530, 2013 मध्ये 515, 2014 मध्ये 591, 2015 मध्ये 708, 2016 मध्ये 1303, 2017 मध्ये 1024, 2018 मध्ये 1190, 2020 मध्ये 1889, 2021 मध्ये 805, 2022 मध्ये 862, 2023 मध्ये 617 आणि 2024 मध्ये 1368 अवैध भारतीयांना भारतात पाठवले होते.