शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम कुठपर्यंत? समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 07:50 IST

construction of Ram Mandir: अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिर निर्माणाचे काम वेगाने सुरू असून, फेब्रुवारी महिन्यात मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे.

- विनय उपासनी मुंबई : अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिर निर्माणाचे काम वेगाने सुरू असून, फेब्रुवारी महिन्यात मंदिराच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. येत्या जून महिन्यापासून गर्भगृहाच्या बांधकामाला सुरुवात होईल आणि २०२४च्या जानेवारी महिन्यानंतर गर्भगृहात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजाअर्चा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर हैदराबाद येथील भूगर्भशास्त्रज्ञांच्या सल्ल्याने कामाला सुरुवात झाली. साडेतीन एकर जागेत ४५ मीटर खोलपर्यंत खणण्यात आले. तेथील एकूण १ लाख ८५ हजार घनमीटर माती बाजूला काढण्यात आली. त्यानंतर सिमेंट, गिट्टी, फ्लाय ॲश आणि रसायन यांच्या मिश्रणाने काँक्रीट तयार करण्यात आले. या मिश्रणाचे ४८ थर पायात भरण्यात आले. या प्रक्रियेला रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट असे संबोधले जाते, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन मंत्री आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे पदाधिकारी श्री गोपालजी यांनी दिली. 

ऑगस्टपर्यंत चबुतरा पूर्ण सध्या चबुतऱ्याचे बांधकाम सुरू असून, साडेसोळा फूट उंचीचा हा चबुतरा असेल. त्याखाली साडेचार फूट उंचीपर्यंत शिळा रचल्या जातील. अशी एकूण २१ फूट उंचीपर्यंत चबुतऱ्याची उंची असेल. त्यासाठी बंगळुरू येथील ग्रॅनाइट आणण्यात आले आहेत. या कामासाठी पाच फूट लांब, अडीच फूट रुंद आणि तीन फूट जाड अशा १७ हजार शिळा लागणार आहेत. चबुतऱ्याचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाईल, असे श्री गोपालजी यांनी सांगितले. अशी असेल मंदिराची रचना - चबुतऱ्यावर तीन मजली बांधकाम केले जाईल. - प्रत्येक मजला २० ते ३० फूट उंचीचा असेल. - बांधकामासाठी पिंक सँड स्टोनचा वापर होणार आहे. - मंदिराच्या आजूबाजूला चारही दिशांना २५ ते ३० फूट अंतरावर प्रदक्षिणा मार्ग तयार केला जाणार आहे. - याशिवाय मंदिर परिसरात छोटी गोशाळा, यज्ञ मंडप, अनुष्ठान मंडप आणि म्युझियम यांचीही उभारणी केली जाणार आहे. - या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील. 

₹३३०० कोटी निधी  संकलनमंदिराची एकूण उंची १६१ फूट२१ फूट  उंचीपर्यंत चबुतऱ्याची उंची असेलएकूण १५० मजूर या ठिकाणी काम करत आहेत.  याशिवाय एल अँड टी आणि टाटा कन्सल्टन्ट्सचे अभियंतेही मंदिर निर्माणाच्या कार्यात आहेत. अस्थायी मंदिरात दररोज किमान २० हजार भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिरात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश