शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

Exit Poll: एक्झिट पाेल कसा करतात रे भाऊ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 07:03 IST

Exit Poll: लाेकसभा असाे किंवा विधानसभा निवडणूक, मतदानाची वेळ संपली की लगेच एक्झिट पाेलचे आकडे प्रसिद्ध करण्यात येतात. काेणाचे सरकार येणार, याचा अंदाज त्यातून वर्तविण्यात येताे. 

नवी दिल्ली - लाेकसभा असाे किंवा विधानसभा निवडणूक, मतदानाची वेळ संपली की लगेच एक्झिट पाेलचे आकडे प्रसिद्ध करण्यात येतात. काेणाचे सरकार येणार, याचा अंदाज त्यातून वर्तविण्यात येताे. मात्र, या एक्झिट पाेलबाबत लाेकांच्या मनात अनेक प्रश्न असतात, की हा काय प्रकार आहे, काेणाचे सरकार येणार, हा दावा कशाच्या आधारे केला जाताे, एक्झिट पाेल आणि ओपिनियन पाेल यांच्यात फरक काय इत्यादी. त्यांचीच उत्तरे देण्याचा हा प्रयत्न.

एक्झिट पाेल एक्झिट पाेल मतदानाच्या दिवशी ते केले जाते. मतदान केल्यानंतर सर्वेक्षण करणाऱ्या विविध संस्था मतदारांना काही प्रश्न विचारतात. त्यातून त्यांनी काेणाला मतदान केले, याचा अंदाज वर्तविण्यात येताे. 

ओपिनियन पाेलहे सर्वेक्षण निवडणुकीच्या आधी केले जाते. सर्व घटकांतील लाेकांना त्यात सहभागी केले जाते. मतदारसंघातील प्रमुख मुद्द्यांवर प्रश्नावली तयार केली जाते. त्यातून जनतेचा मूड काय आहे, हे जाणून घेतला जाताे. 

- भारतात १९६० मध्ये सर्वप्रथम दिल्लीतील ‘सेंटर फाॅर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग साेसायटीज’ने एक्झिट पाेलची सुरुवात केली हाेती. - १९९८मध्ये खासगी वृत्तवाहिन्यांनी प्रथमच एक्झिट पाेलचे प्रसारण केले हाेते.- १९३५ मध्ये अमेरिकेत जगातील पहिला एक्झिट पाेल प्रसिद्ध झाला हाेता. - त्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्समध्ये एक्झिट पाेल प्रसिद्ध झाला हाेता. 

सर्वेक्षण प्रसिद्ध कधी हाेतात?मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पाेल प्रसिद्ध करू शकत नाही. तसे केल्यास तुरुंगवास आणि आर्थिक दंड, अशा कठाेर शिक्षेची तरतूद आहे. 

१९९८मध्ये लाेकसभेवेळी निवडणूक आयाेगाने सर्वप्रथम एक्झिट पाेल प्रसिद्ध करण्यावर निर्बंध घातले हाेते. त्याविराेधात प्रसारमाध्यमांनी न्यायालयांत धाव घेतली हाेती. मात्र, न्यायालयाने आयाेगाची बाजू उचलून धरली हाेती. 

टॅग्स :exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीElectionनिवडणूक