शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी समितीने एवढी तत्परता कशी दाखविली?; कोर्टाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 07:18 IST

निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार; रश्मी बर्वेंची याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :  रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द ठरविताना समाज कल्याण विभागाच्या जात पडताळणी समितीने दाखवलेल्या तत्परतेवर आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात नापसंती व्यक्त केली. मात्र, संविधानातील अनुच्छेद ३२९ नुसार निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्यात हस्तक्षेप करता येत नसल्यामुळे बर्वे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली.

बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरविण्याच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देताना त्यांचा अर्ज बाद करण्याच्या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यामुळे बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील न्या. सतीशचंद्र शर्मा आणि न्या. संदीप मेहता यांच्या पीठापुढे सुनावणी झाली. 

रश्मी बर्वे यांच्या बाबतीत जे काही झाले ते योग्य नसल्याचे मौखिक निरीक्षणे नोंदविताना न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सॉलिसीटर जनरल तुषार मेहता आणि ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना न्यायालयाचे म्हणणे महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश दिले.  

प्रमाणपत्र रद्द करण्याची पद्धत योग्य नाहीअनेकदा न्यायालयाच्या आदेशांचे राज्य सरकारच्या यंत्रणा पालन करीत नाही. पण या प्रकरणात जात पडताळणी समितीने अचानक एवढी तत्परता का दाखवली, असा प्रश्न करीत बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी अवलंबिण्यात आलेली पद्धत योग्य नसल्याचे निरीक्षण न्या. गवई यांनी नोंदविले. रामटेक मतदारसंघातील अन्य प्रतिस्पर्धी उमेदवारांना या प्रकरणात प्रतिवादी का केले नाही, असा सवाल त्यांनी बर्वे यांचे वकील दामा शेषाद्री नायडू यांना केला. हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रविष्ट होते व उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच होती, असे नायडूंनी सांगितले.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रSupreme Courtसर्वोच्च न्यायालयlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४