शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पी. चिदम्बरम अडचणीत कसे आले? एअरसेल - मॅक्सिस प्रकरण काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 05:45 IST

एअरसेल टेलिव्हेंचर्स ही सी. शिवशंकर यांची सेलफोन कंपनी, तर मॅक्सिस टेलिकॉम ही मलेशियाच्या टी. आनंद कृष्णन या श्रीलंकेतील उद्योगपतीची कंपनी आहे.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : माजी अर्थमंत्री ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम एअरसेल-मॅक्सिस सौदा व आयएनएक्स मीडिया या प्रकरणात अडकले आहेत. ही प्रकरणे चिदम्बरम यूपीए-१ मध्ये अर्थमंत्री असतानाची (२००६ व २००७)आहेत. लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याबाबत सीबीआय व ईडी चौकशी करत आहे.एअरसेल टेलिव्हेंचर्स ही सी. शिवशंकर यांची सेलफोन कंपनी, तर मॅक्सिस टेलिकॉम ही मलेशियाच्या टी. आनंद कृष्णन या श्रीलंकेतील उद्योगपतीची कंपनी आहे. २००६ मध्ये एअरसेलमधील शिवशंकर यांचे ७४ टक्के भांडवल मॅक्सिस टेलिकॉमने ४००० कोटींमध्ये विकत घेतले. मॅक्सिस विदेशी कंपनी असल्याने सौद्याला फॉरेन एक्स्चेंज प्रमोशन बोर्डाची परवानगी आवश्यक होती. ती चिदम्बरम यांनी रोखून धरली, असा सीबीआय व ईडीचा आरोप आहे.चिदम्बरम यांचे चिरंजीव कार्ती यांची आॅसब्रिज होल्डींग्ज अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे व अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग कंपनीमध्ये ६७ टक्के भागीदार आहेत, असा आरोप भाजपचे खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. खरे तर आॅसब्रिज ही मोहनन राजेश यांची कंपनी आहे.अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिकने २००६ पूर्वी एअरसेलला २६ लाखांचे कर्ज दिले होते. त्या मोबदल्यात शिवशंकर यांना मिळालेल्या ४००० कोटीपैकी ५ टक्के वाटा (२०० कोटी) कार्ती यांना मिळेपर्यंत चिदम्बरम यांनी एफआयपीबीची परवानगी रोखल्याचा स्वामींचा आरोप आहे. कार्ती यांनी १६ जानेवारी २००६ ते २३ सप्टेंबर २००९ या काळात १.८० कोटी चिदम्बरम यांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा स्वामी यांचा आरोप आहे. सीबीआयने कार्ती व पी. चिदम्बरम यांच्याविरोधात २५ आॅक्टोबर २०१५ रोजी आरोपपत्र कोर्टात दाखल केले. २८ फेब्रुवारी २०१८ ला कार्ती यांना अटक केली. ते सध्या जामिनावर आहेत.टीप : सोशल मीडियावर शेकडो पोस्ट फिरत आहेत, त्यापैकी एक म्हणजे अ‍ॅडव्हान्टेज स्टॅÑटेजिकच्या ४ संचालकांनी (भास्कर रामन, सीबीएन रेड्डी, रवी विश्वनाथन व पद्मा विश्वनाथन) आपले ६०% भांडवल मृत्युपत्राद्वारे कार्ती यांची कन्या आदितीला देण्याची आहे. अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिकचे ४०% भांडवल मोहनन राजेश यांच्याकडे असल्याचे यात म्हटले आहे. या कंपनीने वासन आयकेअरचे ६०% भांडवल ५० लाखांत घेतल्याचे व उर्वरित ४० % भांडवल मॉरिशसच्या सेक्वोईना कॅपिटलला ४५ कोटींत दिल्याचे म्हटले आहे. पण सीबीआयच्या कागदपत्रांत याचा उल्लेख नसल्याने हा पुरावा नाही. एअरसेल - मॅक्सिस सौदा व चिदंबरम पिता-पुत्र यांचा संबंध हा असा आहे.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम