शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाचे दोषी नेते उमेदवार कसे निवडू शकतात?, सुप्रीम कोर्टाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 10:03 IST

सुप्रीम कोर्टाने सोमवारी गुन्ह्यात दोषी ठरवूनही पक्षाचं अध्यक्षपद सांभाळत असलेल्या राजकीय नेत्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने सोमवारी गुन्ह्यात दोषी ठरवूनही पक्षाचं अध्यक्षपद सांभाळत असलेल्या राजकीय नेत्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दोषी व्यक्ती निवडणूक लढवायला अपात्र असताना तो राजकीय पक्षाचा अध्यक्ष कसा राहू शकतो?' असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला.  'दोषी व्यक्ती राजकीय पक्षाचे अध्यक्षपद सांभाळत असून निवडणुकीत उमेदवारांचीही निवड करत आहेत. तसंच या दोषी राजकारण्यांच्या पक्षाचे काही लोक सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता असते, असं ही मत व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. 

जर एखादा व्यक्ती लोकप्रतिनिधी कायद्यानुसार निवडणूक लढवू शकत नाही तर तो राजकीय पक्षाची स्थापना कशी करू शकतो? तो पक्षाच्या उमेदवारांची निवडणूक लढविण्यासाठी निवड कसा करू शकतो?' असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला. कोर्टाने म्हंटलं, अशी लोक शाळा किंवा इतर कोणत्या संस्था निर्माण करत असतील तर काही अडचण नाही. पण तशी लोक पक्ष स्थापन करत आहेत. जो पक्ष सरकार चालवेल, हे एक गंभीर प्रकरण आहे.  

सरन्यायाधीश दीपक मिक्षा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. डागाळलेल्या नेत्यांच्या विरोधात वकील अश्विनी उपाध्याय यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गंभीर गुन्ह्यांसाठी जे राजकारणी दोषी ठरविण्यात आले आहेत. त्यांना निवडणूक लढविण्यावर बंदी आहे. असं असतानाही त्यांनी पक्ष स्थापन केले असून पक्षाचे अध्यक्ष आहेत. ओम प्रकाश चौटाला, शशिकला हे नेते आजही पक्षाचे प्रमुख बनलेले असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

यावेळी निवडणूक आयोगाच्यावतीने अमित शर्मा यांनी आयोगाची भूमिका मांडली. 'अशा राजकारण्यांना अटकाव करण्याची भूमिका निवडणूक आयोग १९९८ पासूनच मांडत आहे. पण दोषी नेत्यांना पक्ष चालविण्यास बंदी घालण्याचे अधिकार आयोगाला नाहीत. जर लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती करून अशा प्रकारची बंदी घातली जात असेल तर आम्ही त्याची तात्काळ अंमलबजावणी करू,' असं अमित शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliticsराजकारण