शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 15:02 IST

महत्वाचे म्हणजे, हे प्रसादाचे लाडू मंदिराच्या स्वयंपाकघरातच तयार केले जातात...

आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजीच्या प्रसादावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका अहवालाचा हवाला देत आरोप केला होता की, पूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात महाप्रसादम बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तूपात गाईच्या आणि डुकराच्या चरबीची भेसळ होती. टीडीपीने वायएसआर काँग्रेसवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तूप शुद्ध नव्हते, त्यात गायीच्या चरबीची भेसळ होती, अशी पुष्टी एका अहवालात करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, हे प्रसादाचे लाडू मंदिराच्या स्वयंपाकघरातच तयार केले जातात आणि त्यांना पोट्टू म्हटले जाते.

असे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू - महाप्रसादाचे हे लाडू बनवण्याच्या प्रक्रियेला 'दित्तम' असे म्हटले जाते. यात सर्व गोष्टी विशिष्ट प्रमाणात टाकल्या जातात. 300 वर्षांच्या इतिहासात या लाडूंची रेसिपी केवळ सहा वेळाच बदलण्यात आली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या 2016 च्या अहवालानुसार, या लाडूमध्ये एक विशिष्ट प्रकारचा दैवी सुगंध येतो. सर्वप्रथम बेसनापासून बुंदी तयार केली जाते. लाडू खराब होऊ नयेत यासाठी गुळाच्या पाकाचा वापर केला जातो. यानंतर त्यात आवळा, काजू आणि मनुका टाकल्या जातात. बुंदी बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो.

रोज तयार केले जातात तीन लाख लाडू - टाईम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तानुसार, टीटीडी रोज साधारणपणे 3 लाख लाडू तयार करते. या लाडूंपासून बोर्डाला एका वर्षात अंदाजे 500 कोटी रुपये मिळतात. मंदिरात प्रसादासाठी 1715 पासून लाडू तयार केले जातात असल्याचे बोलले जाते. 2014 मध्ये तिरुपती लाडूल GI टॅग मिळाला आहे. यामुळे आता या नावाने कुणीही लाडू विकू शकत नाही. या लाडूंमध्ये मुबलक प्रमाणात साखर, काजू आणि मनुके असतात. एका लाडूचे वजन साधारणपणे 175 ग्रॅम एवढे असते.

काय आहे लॅब अहवाल? -जुलै महिन्यात एका लॅब टेस्ट दरम्यान, वायएसआरसीपी सत्तेत असताना प्रसिद्ध तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आली. तुपात फिश ऑइल, बीफ फॅट आणि चरबीचे अंश आढळून आले होते. तसेच, चरबी एक अर्ध-घन पांढरे चरबी उत्पादन आहे, जे डुकरांच्या चरबीयुक्त उतकांपासून घेतले जाते.

23 जुलै रोजी लाडूंच्या चवीसंदर्भातील तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली. यात नारळ, कापूस आणि मोहरीचे तेलही आढळून आले. जून महिन्यात, टीडीपी सरकारने एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची टीटीडीचे कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAndhra Pradeshआंध्र प्रदेश