घरगुती सिलेंडर महागले
By Admin | Updated: October 29, 2014 15:13 IST2014-10-29T15:07:47+5:302014-10-29T15:13:18+5:30
केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडर वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ केल्याने अनुदानित एलपीजी सिलेंडर तीन रुपयांनी महागले आहे.

घरगुती सिलेंडर महागले
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडर वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ केल्याने अनुदानित एलपीजी सिलेंडर तीन रुपयांनी महागले आहे. २३ ऑक्टोबरपासून ही नवीन दरवाढ लागू झाली आहे. एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत.
एलपीजी सिलेंडर वितरकांच्या कमिशनमध्ये डिसेंबर २०१३ मध्ये वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा १० महिन्यांमध्ये वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. वितरकांना यापूर्वी प्रति सिलेंडर मागे ४० रु. ७१ पैसै मिळायचे. आता त्यांना प्रति सिलेंडरमागे ४३ रुपये ७१ पैसे मिळणार आहेत. कमिशनमध्ये वाढ झाल्याने सिलेंडरही तीन रुपयांनी महागले आहे. यापूर्वी मुंबईत ४४८ रुपये ५० पैशाला मिळणारे सिलेंडर ४५२ रुपयांना मिळणार आहे.